Next

एक अफवा.. आणि लोकं विमानाला लटकले | Taliban Violence in Afghan | International News

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 11:33 AM2021-08-18T11:33:46+5:302021-08-18T11:34:20+5:30

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवला आणि अफगाणी लोकांचं आयुष्यचं बदलून गेलंय.. तालिबानी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडलेला बरा असंही अनेकांना वाटतं. देश सोडण्यासाठी लोकांची झालेली धडपड संपुर्ण जगाने पाहिली.. या दरम्याने विमानामागे पळताना, विमानाला लटकतानाचे व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाले. विमानात चढण्यासाठी झालेली गर्दीही जगाने पाहिली... पण यादरम्यान विमानाला लटकलेल्या अनेक लोकांचा दुर्देवी म़ृत्यूदेखील झाला. हे सर्व चित्र मन पिळवटून टाकणारं होतं. अमेरिकन विमानाला लटकून प्रवास करणाऱ्या अफगाणी नागरिकांचा व्हिडीओ समोर आला. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत भीषण वास्तव जगासमोर दाखवलं. पण, काबुल विमानतळावर ही गर्दी होण्यामागे एक अफवा असल्याचं सांगितलं जातंय.