शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमधील नागरिक लसीकरणासाठी मीरा-भाईंदर केंद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:35 IST

स्थानिकांना बसतोय फटका : आधीच लसींचा कोटा कमी

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिका हद्दीतील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिल्या जाणाऱ्या लसीकरण केंद्रावर वसई तालुक्यातून नागरिक येऊन लस घेऊन जात असल्याचे उघड झाले आहे. मीरा- भाईंदरमधील नागरिकांच्या वाट्याचा लसींचा कोटा असताना अन्य भागातून नागरिक लसीकरणासाठी येत असल्याने त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे.मीरा- भाईंदर महापालिका हद्दीतील नागरिकांना लस देण्यासाठी महापालिकेची ११ तर खासगी ९ लसीकरण केंद्र सुरू आहेत. या एकूण २० लसीकरण केंद्रावर रोज एकूण मिळून ५ हजार नागरिकांना लस देण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. त्यासाठी आयुक्त दिलीप ढोले यांच्या नेतृत्वाखाली पालिका अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक, आशा वर्कर आदींच्या वतीने २१ एप्रिलपर्यंत १ लाख २३ हजार ५९६ नागरिकांचे लसीकरण केले आहे . तर यातील १९ हजार १४० नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. एकूण १ लाख ४२ हजार ७३६ लस देण्यात आल्या आहेत.लसीकरण केंद्रात पुरेशी सुविधा व आवश्यक कर्मचारी वर्ग तसेच पोलीस, सुरक्षारक्षक तैनात आहेत. सरकारकडून मीरा- भाईंदरला येणारा लसीचा कोटा हा शहरातील लोकसंख्येच्या अनुषंगाने असला तरी तो कमीच पडत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर रोज ४०० ते ५०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. परंतु शहरातील लसीकरण केंद्रांवर वसई तालुक्यातील नागरिक येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. आधीच मीरा- भाईंदरमधील नागरिकांचे लसीकरण झालेले नसताना वसई तालुक्यातून नागरिक येऊन लसीकरण करून घेत असल्याने शहरातील अनेक जण लसीकरणाअभावी ताटकळत आहेत.भाईंदर पश्चिम येथील पालिकेच्या विनायकनगर लसीकरण केंद्रावर याची माहिती घेतली असता तेथील कर्मचाऱ्यांनीही वसई - विरार, नायगाव, नालासोपारा भागातील नागरिक येऊन लस घेऊन जात असल्याचे सांगितले. लसीकरण केवळ मीरा- भाईंदरमधील रहिवाशांसाठी करावे, असे निर्देश नसल्याने आम्ही तरी काय करणार? असे कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवले. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची नोंदणी होताना त्याच्या आधार ओळखपत्रावरून तो कुठला रहिवासी आहे कळते. परंतु केंद्रावरील नोंदवहीमध्ये मात्र केवळ लस घेणाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक घेतला जातो. तो रहिवासी कुठला आहे याची नोंद घेतली जात नाही. रोज वसई तालुक्यातून १० ते २० टक्के नागरिक लस घेण्यासाठी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांना माहिती घ्यायला सांगू. लसीकरण आधी शहरातील नागरिकांचे होणे अपेक्षित आहे. सरकार महापालिकेनुसार लसींचा कोटा देत असल्याने याबाबत सरकारची नियमावली पडताळून योग्य ती कार्यवाही करू.    - दिलीप ढोले, पालिका आयुक्त

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस