शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: धक्कादायक! सील केलेल्या रुग्णालयातून 24 संभाव्य कोरोना रुग्ण पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 07:12 IST

पळून गेलेल्यांमध्ये रुग्णालयातील 9 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश

कासा : डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, कासा येथील दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने रुग्णालय तत्काळ सील केले, मात्र या रुग्णालयातून २४ कोरोना संशयित रुग्णांनी पलायन केल्याचे उघड आहे.खबरदारी उपाय म्हणून त्या डॉक्टरांच्या सहवासात आलेल्या अन्य डॉक्टर, नर्सेस, इतर कर्मचारी तसेच उपचारासाठी दाखल रुग्ण यांच्यासह रुग्णांचे नातेवाईक अशा एकूण १८७ जणांना उपजिल्हा रुग्णालय कासा या ठिकाणी ‘क्वारंटाइन’ करण्यात आले होते. यामध्ये रुग्णालयातील रुग्ण ५७ (यामध्ये २२ नवजात बालकांचा समावेश), रुग्णांचे ७२ नातेवाईक तसेच ५८ रुग्णालय कर्मचारी यांचा समावेश होता. १६ आणि १७ एप्रिलला या सर्वांचे स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. १८७ संशयितांपैकी ९ कंत्राटी कर्मचारी, १० रुग्णांचे नातेवाईक व ५ रुग्ण असे एकूण २४ कोरोना संशयित पळून गेल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने कासा पोलिसांना दिली होती. हे सर्व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून गेल्याचे समजते.पोलीस प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवस-रात्र मेहनत घेत असताना अशा प्रकारे संशयितांचे पळून जाणे ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. उपजिल्हा रुग्णालयातून २४ कोरोना संशयित पळून गेल्यामुळे कासा परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, हे रुग्णालय सील करण्यात आलेले असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.३७ अतिजोखमींचे अहवाल निगेटिव्हपालघर तालुक्यात १० तर डहाणू तालुक्यात ७ रुग्ण कोरोनाबाधित आढळलेले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, पालघर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३७ अतिजोखमीच्या सहवासितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १३ जणांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. तसेच डहाणू तालुक्यातील रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचे अहवालही निगेटिव्ह आले असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या