शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

गावरान पपईने बनविले अल्पभूधारक शेतकऱ्यास लखपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST

लागवडीपासून सुमारे नऊ  महिन्यांत पहिला तोडा निघाला. तेव्हापासून सरासरी १० दिवसांच्या अंतराने १२ महीने तोडा सुरू होता. पपई विक्रीसाठी मुलगा समीर याची मदत प्रकाशला झाली. सेलू, वडगाव आदी गावात दुचाकीने जाऊन पपईची विक्री करण्यात आली. नागरिकही प्रकाशने उत्पादित केलेल्या पपईची प्रतीक्षा करायचे. पपई विक्रीच्या काळात जास्तीतजास्त ३५ तर किमान १० रुपये किलो भाव मिळाला. एकूणच ४ लाखांचे उत्पन्न प्रकाशला मिळाले. सर्व खर्च वजा जाता, तीन लाखांचा निव्वळ नफा त्याने कमविला आहे. 

ठळक मुद्देतीन लाखांचा कमविला निव्वळ नफा

धीरज देवतारेलोकमत न्यूज नेटवर्कझडशी : येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश कुनघटकर यांनी गावरान पपईचे उत्पन्न घेत तब्बल ३ लाखांचा नफा कमविला आहे. प्रकाश यांचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.प्रकाश यांच्या वाट्याला वडिलोपार्जित ०.७७ हे.आर. शेतजमीन आली. सुरुवातीला या शेतात सिंचनाची सोय नव्हती, शिवाय प्रकाशही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होता. त्याने सुरुवातीला सालगडी म्हणून चाकरी केली. त्यातून पैशाची जुळवाजुळव करून शेतात विहीर खोदत सिंचनाची सोय केली. पपई लागवडीपूर्वी त्याने कपाशी, चणा, गहू, सोयाबीन अशी पारंपरिक पिके घेतली, पण त्यातून पाहिजे तसे उत्पन्न न मिळाल्याने आपणही शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करू, असे निश्चित केले. ग्रामसभेत कृषी सहायक एस.एम. महाकाळकर यांच्याशी त्याची भेट झाली. चर्चेत पपई किंवा केळी लागवडीबाबत त्यांना प्राथमिक मार्गदर्शन मिळाले. अखेर पपई लागवड करण्याचे ठरवून गावरान पपईची लागवड ०.२२ हेक्टरवर करण्यात आली. योग्य निगा घेतल्याने सहा महिन्यांत पपईची झाडे  फुलावर आली. लागवडीपासून सुमारे नऊ  महिन्यांत पहिला तोडा निघाला. तेव्हापासून सरासरी १० दिवसांच्या अंतराने १२ महीने तोडा सुरू होता. पपई विक्रीसाठी मुलगा समीर याची मदत प्रकाशला झाली. सेलू, वडगाव आदी गावात दुचाकीने जाऊन पपईची विक्री करण्यात आली. नागरिकही प्रकाशने उत्पादित केलेल्या पपईची प्रतीक्षा करायचे. पपई विक्रीच्या काळात जास्तीतजास्त ३५ तर किमान १० रुपये किलो भाव मिळाला. एकूणच ४ लाखांचे उत्पन्न प्रकाशला मिळाले. सर्व खर्च वजा जाता, तीन लाखांचा निव्वळ नफा त्याने कमविला आहे. 

खापरीत मिळाले बियाणेगावरान पपई बाजारपेठेत कमी येत असल्याने, त्याचीच लागवड करण्याचे प्रकाशने निश्चित केले, पण अडचण होती, ती गावरान पपईच्या बियाण्याची. काहींना विचारणा केल्यावर खापरी येथील प्रमोद उडान यांच्याकडे बियाणे असल्याची माहिती प्रकाशला मिळाली. त्यांनी उडान यांच्याकडून बियाण्यांची खरेदी करून गावरान पपईची लागवड केली. दहा ते बारा झाडांमागे एक पपईचे नर झाड लावले, तर उर्वरित नर झाडे उपटून टाकली.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती