Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ram mandir, Latest Marathi News
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
MNS MLA Raju Patil donation for Ayodhya Ram temple : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनीही अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिली आहे. ...
मथुरामधील एका मंडळाकडून श्रीराम मंदिरात रावणाचीही भव्य मूर्ती स्थापन करा, अशी अजब मागणी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर या संघटनेनेन पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्रही पाठवले आहे. ...
गौतम गंभीरने कोरोना संकटात अनेक समाजकार्य केले. त्यानं त्याचा खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाची मुकाबला करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही त्यानं भरभरून मदत केली ...
बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक निकालानंतर या बाबरीची बाजू लढवणारे वकील इक्बाल अन्सारी यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या महाअभियानाचं स्वागत केलं आहे. ...
अयोध्येतील बांधण्यात येणारे प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हे विश्वाला संस्कार देणारे व माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याची शिकवण देणारे ठरेल, असे गौरवोदगार श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यातील सदस्य श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगि ...