"ओवैसी म्हणजे..., देशाची जनता त्यांना चांगलीच ओळखू लागली"; भर सभेत भाजपा खासदाराची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 10:30 AM2021-01-19T10:30:02+5:302021-01-19T10:30:08+5:30

Sakshi Maharaj And Asaduddin Owaisi : साक्षी महाराज यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्लोबोल करत निशाणा साधला आहे.

mp sakshi maharaj told owaisi the dirty animal of hyderabad and said country has known the reality | "ओवैसी म्हणजे..., देशाची जनता त्यांना चांगलीच ओळखू लागली"; भर सभेत भाजपा खासदाराची जीभ घसरली

"ओवैसी म्हणजे..., देशाची जनता त्यांना चांगलीच ओळखू लागली"; भर सभेत भाजपा खासदाराची जीभ घसरली

Next

उन्नाव - भाजपाचे खासदार साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहे. पुन्हा एकदा ते आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. साक्षी महाराज यांनी यावेळी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्लोबोल करत निशाणा साधला आहे. मात्र ओवैसीबाबत बोलताना भाजपा खासदाराची जीभ घसरली आहे. त्यांनी एका कार्यक्रमात ओवैसींना "गंदा जानवर" असं म्हटलं आहे. तसेच त्यांच्या सारख्या लोकांना देशातील जनता चांगलीच ओळखून आहे असं म्हटलं आहे. भाजपा खासदाराच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी महाराज रविवारी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. येथे उपस्थितांना त्यांनी संबोधित केलं. यावेळी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) च नेते असदुद्दीन ओवैसींवर त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "अयोध्येत राम मंदिरावर विधान करणारे ओवैसी हैदराबादचे घाणरडं जनावर आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळात मंदिराचं निर्माण सर्वांच्या सहकार्याने होत आहे. ओवैसी रक्ताचे पाट वाहण्याची भाषा करत होते. मात्र मोदीजींच्या शासनकाळात रक्ताचा एकही थेंब न सांडता शांतीपूर्ण पद्धतीनं मंदिर निर्माणाच्या कामाला सुरुवात झाली आहे" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे.

"ओवैसींसारख्या लोकांना देशाची जनता आता चांगलीच ओळखू लागली आहे. त्यांच्या जाळ्यात आता कोणीच फसणार नाही. अयोध्येत मंदिर निर्माणासाठी दोन्ही वर्गाचे लोक शांततेत काम करत आहेत हेच त्यामागचं कारण आहे" असं देखील साक्षी महाराज यांनी कार्यक्रमात म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ओवैसींनी आपला मोर्चा उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालकडे वळवला आहे. ओवैसी यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला. तसंच त्यांनी आपल्या समर्थकांची आणि आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. यादरम्यान साक्षी महाराज यांनी एक मोठं विधान केलं होतं. "ओवैसी यांनी बिहारमध्ये भाजपाची मदत केली. आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही तसंच होईल," असं ते म्हणाले होते. 

"देव त्यांना ताकद देवो, त्यांची साथ देवो, त्यांनी बिहारमध्ये आम्हाला मदत केली होती. आता ते पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील मदत करतील" असं विधान साक्षी महाराज यांनी केलं आहे. "आम्ही मुस्लिमांचाही विश्वास मिळवत आहोत. गेल्या 65 वर्षांपासून भारतातील मुस्लिमांना तुष्टीकरणाच्या नावाखाली घाबरवण्यात आलं. परंतु आज मुस्लिमांना आपलं हित जाणणारा पक्ष हा भाजपा हे समजून आलं आहे. मोठ्या संख्येने मुस्लीम वर्गही भाजपाशी जोडला जात आहे" असंही ते म्हणाले होते.

"कृषी आंदोलनात प्रदर्शन करणारे भरकटलेले शेतकरी; काहींच्या पोटात दुखतंय, त्यांचा हेतू वेगळाच"

साक्षी महाराजांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. "कृषी कायद्यांचा विरोध नाही हे तर सीएए, एनआरसी, कलम 370 चं दु:ख" असं मंगळवारी आपला वाढदिवस साजरा करत असताना साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. कृषी आंदोलनात प्रदर्शन करणारे काही भरकटलेले शेतकरी आहेत असं देखील म्हटलं होतं. "दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांचा विरोध नाही तर सीएए, एनआरसी आणि कलम 370 चं दु:ख बाहेर पडत आहे. कृषी आंदोलनात प्रदर्शन करणारे काही भरकटलेले शेतकरी आहेत. काही लोक तर शेतकरीही नाहीत तर मोठे व्यापारी आहेत. खरे शेतकरी आपापल्या शेतात काम करत आहेत. तुम्हाला शेतकऱ्यांना पाहायचंय तर गंज मुरादाबादमध्ये शेतकरी संमेलन आहे, तुम्ही चला मी दाखवतो. ते कसे शेतात काम करत आहेत. अशाच लोकांच्या पोटात दुखतंय. संपूर्ण देशात फक्त दोन ते तीन ठिकाणी आंदोलन सुरू आहे" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं होतं.

Web Title: mp sakshi maharaj told owaisi the dirty animal of hyderabad and said country has known the reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.