मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गोरेगावमधील पहाडी भागात असलेल्या भूखंडावर म्हाडा सर्वसामान्यांसाठी तब्बल ७,५०० घरे उभारणार आहे. म्हाडाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. ...
सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. ...
मुंबई विमानतळावरील इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (आएलएस) प्रणालीमधील सुधारणेचे काम पूर्ण झाल्याने मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे व लँडिंगमध्ये होणारा विलंब टळणार आहे. ...
महापारेषणच्या कळवा येथील उपकेंद्रात झालेल्या बिघाडाचा परिणाम म्हणून शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. तो सुरळीत होण्यास शुक्रवारी रात्रीचे ९ वाजले. ...
शहरात सुमारे १४ हजार २८६ उपकरप्राप्त इमारती आहेत. यातील जवळपास सर्वच इमारती जुन्या व मोडकळीस आल्या आहेत. दरवर्षी म्हाडाच्या दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत या इमारतींचे सर्वेक्षण करून पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. ...
किरकोळ तापावर स्थानिक डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शननंतर एका २५ वर्षीय तरुणाची प्रकृती बिघडली. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देत, उपचाराचा सर्व खर्च करण्याचे संबंधित डॉक्टरने कबूल केले. ...