मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी 2019-20 या आर्थिक वर्षाचा 30 हजार 692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. मेहता यांनी सोमवारी (4 फेब्रुवारी) स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्प सादर केला. ...
जकात कर रद्द, मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची साडेसात हजार कोटींची थकबाकी, सातवा वेतन आयोगाचा भार, यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. ...
उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला जकात कर रद्द झाल्यानंतर पालिकेची मदार विकास कर, मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवर आहे. मात्र या वर्षाचा मालमत्ता कर आणि थकबाकीच्या माध्यमातून पाच हजार ४३९ कोटी तर पाणीपट्टीचे दोन हजार कोटी रुपये पालिकेला येणे आहे. ...