Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. ...
Maharashtra Political Crisis Shivsena Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. य़ानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस आमदारांविषयी मोठे विधान केल्याचे सांगितले जात आहे. ...