देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
नवी दिल्ली : स्वातंत्र्यकाळापासून बराच वेळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसला निधीची चणचण भासू लागली आहे. उद्योगपतींनी देणग्या देण्याकडे पाठ फिरविल्याने काँग्रेस येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये मत मागण्याबरोबरच लोकांकडून देणगीही मागणार आहे. आता पक्षासाठी निध ...
काँग्रेसच्यावतीने राज्यात युवक काँग्रेसच्या निवडणूका घेण्यात येत आहे.जिल्ह्यातही या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात आली असून तीन दिवस मतदार संघनिहाय हा रणसंग्राम चालणार आहे. ...
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस दरवाढीच्या विरोधात प्रदेश काँग्रेस पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यानुसार, आज गोवा काँग्रेसचे कार्यकर्ते पर्वरी येथे निदर्शने करणार आहेत. ...