देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अर्थसंकल्पातील वित्तीय तूट दिवसेंदिवस वाढत आहे. ती कमी करण्यासाठी एलआयसीच्या निर्गुंतवणुकीतून पैसा उभारला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारचे हे धोरण देशाच्या विकासाला बाधक ठरणारे आहे. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष पूर्ण जोर लावत आहेत. सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यात येथील लढत होत आहे. त्यातच शुक्रवारी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र या जाहीरनाम्यावरच काँग्रेस नेत्यांचं नाव आले आहे. ...