देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गलवानमध्ये बलिदान दिलेल्या वीर जवानांना जनता साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देत आहे. मात्र दुसरीकडे राजधानी दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. ...
गलवान खोरे भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने सध्या देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, या घटनेवरून आला राजकारणही सुरू झाले आहे. ...
गेल्या आठवडाभरापासून दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांची भेट मागत होते. गेल्या आठवड्यातील गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. ...