आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
विडंबनात्मक भजनाच्या माध्यमातून विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी राज्य सरकारचा निषेध केला. राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरु आहे. ...
शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री आशिष शेलार विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत शेलारांसमोर कोणाला उमेदवारी द्यावी, असा पेच काँग्रेससमोर पडला आहे. ...