शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपलने नथिंगचा मुख्य डिझायनर पळवला; कार्ल पेई यांनी टिम कूकनाच टॅग केले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 11:13 IST

कंपन्या आपापली उत्पादने दुसऱ्यापेक्षा सरस कशी हे सांगत असतात. परंतू, ती सरस बनविण्यासाठी देखील जे व्यक्ती कारणीभूत असतात त्यांना आपल्या कंपनीत घेण्यासाठी ना ना तऱ्हेचे फासे फेकतात.

दोन कंपन्यांमधील अ‍ॅड वॉर, एकमेकांना टोले हाणण्याचे प्रकार जगाला काही नवीन नाहीत. एकमेकांच्या कंपन्यांतील कर्मचारी पळविण्याचे प्रकारही छोट्या-मोठ्या कंपन्यांत चालतात. परंतू, डिझायनर पळविला म्हणून थेट पहिल्या कंपनीच्या मालकाने दुसऱ्या कंपनीच्या मालकाला एक्स प्लॅटफॉर्मवर टॅग करणे आणि टोला हाणणे हा प्रकार मात्र नव्यानेच घडला आहे. 

झाले असे की कंपन्या आपापली उत्पादने दुसऱ्यापेक्षा सरस कशी हे सांगत असतात. परंतू, ती सरस बनविण्यासाठी देखील जे व्यक्ती कारणीभूत असतात त्यांना आपल्या कंपनीत घेण्यासाठी ना ना तऱ्हेचे फासे फेकतात. अ‍ॅपल आणि नथिंगमध्येही असेच काहीसे घडले आहे. कार्ल पेई या नथिंगच्या सीईओंनी थेट अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनाच टॅग करत सणसणीत टोला हाणला आहे. कार्ल पेई हे वनप्लसशी संबंधीत होते. त्यांनी काही वर्षांपूर्वीच नथिंग ही स्मार्टफोन कंपनी लाँच केली आहे. 

सॉफ्टवेअर क्रिएटिव्ह डायरेक्टर म्लाडेन एम होयेस यांनी काही दिवसांपूर्वीच ते अ‍ॅपलमध्ये नवीन जबाबदारी सांभाळत असल्याचे जाहीर केले होते. नथिंगच्या युआय डिझाईन आणि फोनच्या डिझाईनने जगाचे लक्ष वेधले होते. मिनिमलिस्ट डिझाईनमुळे हे फोन लोकांच्या नजरेत भरले होते. भारतातही हे फोन उपलब्ध आहेत, परंतू ते निमशहरी भागात फारसे प्रचलित नाहीत. अनेक लोकांना या कंपनीबद्दल, फोनबद्दल माहितीही नाही. तसेच शहरे सोडली तर कंपनीची सर्व्हिस सेंटरही नाहीत. 

कार्ल पेई यांनी होयेस यांना शुभेच्छा दिल्या, परंतू त्याच ट्विटमध्ये त्यांनी टिम कुक यांना टॅग करत जर तुम्हाला उत्पादनासाठी आणखी काही मदत हवी असेल तर मला कळवा, असेही म्हटले आहे. यामुळे आता टिम कुक पेई यांच्या या टोल्याला कसे उत्तर देतात याकडे उद्योग जगताचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपल