शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: २० सेकंदात खाल्ल्या १७ चापटी, मिरची पूड फेकून दागिने लुटायला गेलेल्या महिलेचा प्लॅन फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:13 IST

गुजरातमधल्या चोरीच्या प्रयत्नाचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ahmedabad Woman Tries to Rob:गुजरातमधील अहमदाबाद येथील चोरीच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेने ज्वेलरी शॉप लुटण्याचा प्रयत्न केला, पण दुकानदाराच्या  हिंमतीमुळे आणि तत्परतेमुळे तिची ही योजना काही सेकंदांतच पूर्णपणे फसली. ही महिला ग्राहक बनून दुकानात आली होती. तिने दागिने पाहण्याच्या बहाण्याने दुकानदाराचे लक्ष विचलित केले आणि अचानक त्याच्यावर मिरची पूड फेकली. मिरची पूड फेकून चोरी करण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये पूर्णपणे रेकॉर्ड झाली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अहमदाबादच्या राणीप भाजी मंडईतील एका ज्वेलरी शॉपमध्ये घडली. ही महिला गिऱ्हाईक बनून दुकानात शिरली होती. दागिने पाहण्याच्या बहाण्याने तिने दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवलं. दुकानदार दागिने दाखवण्यामध्ये व्यस्त असतानाच, महिलेने अचानक आपल्या पर्समधून मिरची पूड काढून दुकानदाराच्या दिशेने फेकली. मिरची पूड फेकल्यामुळे दुकानदार गोंधळून जाईल आणि या संधीचा फायदा घेऊन दागिने घेऊन पळून जाता येईल, अशी तिची योजना होती.

मिरची पूड फेकल्यामुळे दुकानदार थोडासा गाफील झाला, पण त्याने लगेचच तत्परता दाखवत पलटवार केला. महिला तिच्या लुटीच्या प्रयत्नात यशस्वी होण्यापूर्वीच, दुकानदार तिच्यावर तुटून पडला. दुकानदाराने केवळ २० सेकंदांच्या आत महिलेला १७ हून अधिक जोरदार कानाखाली मारल्या. दुकानदाराच्या या प्रतिकारामुळे महिला पूर्णपणे घाबरली आणि गोंधळून गेली. तिची लुटीची योजना जागच्या जागीच फेल झाली.

व्हिडिओ व्हायरल, पोलिसांचा तपास सुरू

दुकानदाराने महिलेला मारहाण करून दुकानातून बाहेर ढकलले, त्यानंतर ती महिला घटनास्थळावरून पळून गेली. संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दुकानदाराच्या हिंमतीची चर्चा सर्वत्र सुरू झाली. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर अहमदाबाद पोलिसांनी या लुटमारीचा प्रयत्न करणाऱ्या महिलेची ओळख पटवून तिला शोधण्याचे काम सुरू केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman's pepper spray robbery foiled; shopkeeper retaliates with slaps.

Web Summary : In Ahmedabad, a woman's attempt to rob a jewelry store using pepper spray failed. The alert shopkeeper fought back, slapping her multiple times and thwarting the robbery. Police are investigating the incident captured on CCTV.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलGujaratगुजरात