शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

व्याजासह रक्कम देण्याचे आदेश

By admin | Updated: November 22, 2014 00:11 IST

बिल्डरला दणका : जिल्हा ग्राहक मंचाचा न्यायनिवाडा

सिंधुदुर्गनगरी : बिल्डरने आगाऊ रक्कम घेऊन तसेच नोटरीद्वारे करार करूनही फ्लॅटचा ताबा किंवा रक्कम परत केली नाही म्हणून जिझझ रिअर इस्टेट सावंतवाडी यांच्याविरूद्ध फ्लॅटच्या खरेदीपोटी स्वीकारलेली रक्कम १ लाख २५ हजार ही २१ आॅगस्ट २००८ पासून दसादशे १० टक्के व्याजदराने पूर्ण वसूल होईपर्यंतच्या दिवसापर्यंत द्यावे. तसेच (फ्लॅटधारक) तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी २५ हजार रुपये व तक्रार खर्चापोटी ५ हजार रुपये द्यावेत असे आदेश सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाचे प्रभारी अध्यक्ष कमलाकांत कुबल यांनी दिले.सावंतवाडी येथील जॉन एडवर्ड लोबो यांनी जिझझ रिअर इस्टेटतर्फे प्रोप्रा. लुईजा कार्मा ट्राव्हासो व नॉर्मन मॉर्गन ट्राव्हासो गोवा यांच्याकडून २१ मे २००८ रोजी रजिस्टर साठे करार करून ‘डॉमनिक मेन्सन’ नावाच्या बिल्डींगमध्ये पहिल्या मजल्यावरील ५५० चौरस फूट असलेला फ्लॅट ४ लाख रुपये किंमतीला खरेदी करण्याचा ठरविला. मात्र विविध मुदतीत फ्लॅटचा ताबा जॉन लोबो यांना न देता त्रयस्थ व्यक्तीस तो विकण्यात आला. याबाबतची नोटीस पाठवून लोबो यांना करार संपुष्टात आल्याचे कळविले. मात्र, हे करताना त्याच दरम्यान तक्रारदाराने दिलेले पैसे स्वीकारले. त्यामुळे करार संपुष्टात आलेला नसल्याचा युक्तीवाद तक्रारदाराच्या विधिज्ञांनी केला. तो ग्राह्य धरून ग्राहक मंचाचे फ्लॅटच्या खरेदीसाठी स्वीकारलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे तसेच त्रासापोटी २५ हजार व खर्चापोटी ५ हजार रुपये तक्रारदारास देण्याचे आदेश दिले. ग्राहक मंचाने बिल्डरविरूद्ध आदेश देताना म्हटले आहे की, तक्रारदाराने बुकींग केलेल्या फ्लॅटचे बांधकाम अपूर्ण ठेवून दुसऱ्या ग्राहकास फ्लॅटची विक्री करणे चुकीचे आहे. अशा पद्धतीने अनेकांकडून एकाच फ्लॅटसाठी बुकींगची आगाऊ रक्कम स्वीकारणे हा अनुचित व्यापारी पद्धतीचा प्रकार आहे आणि अशी पद्धत बांधकाम व्यवसायात रूढ झाली तर सर्वसामान्य ग्राहक तथा फ्लॅटधारक त्यामध्ये भरडला जावू शकतो. त्याला न्यायाद्वारे पायबंद घालणे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार क्रमप्राप्त आहे. तक्रारदार जॉन लोबो यांच्यावतीने विधीज्ञ म्हणून अश्विनी वेंगुर्लेकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)