बीड: बीड निवडणूक: पारवेंचा विजय, क्षीरसागर बंधूंना धक्का
बीड निवडणुकीत मोठा उलटफेर! राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवेंनी क्षीरसागर घराण्याची सत्ता उलथवली. पारवेंनी ३,७७९ मतांनी विजय मिळवला. भाजपचे योगेश आणि राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का, पालिकेवरील त्यांची पकड ढिली झाली.
छत्रपती संभाजीनगर: पालकमंत्री शिरसाट आणि खासदार काळेंमध्ये DPDC बैठकीत खडाजंगी.
DPDC बैठकीत पीक नुकसानीच्या मुद्यावरून पालकमंत्री शिरसाट आणि खासदार काळेंमध्ये शाब्दिक वाद झाला. बोलण्याच्या वेळेवर आक्षेप घेतल्याने काळे संतापले आणि त्यांनी घटनात्मक अधिकार सांगितला. वातावरण तणावपूर्ण बनले. नंतर शिरसाट यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, काळे मित्र असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय: बेरोजगारांची झुरळांशी तुलना; सरन्यायाधीशांनी फटकारले
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी करत सोशल मीडिया आणि आरटीआयचा वापर करून व्यवस्थेवर हल्ला करणाऱ्यांवर टीका केली. त्यांनी एका वकिलाच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि वकिलांच्या पदव्यांची चौकशी करण्याचे संकेत दिले.
महाराष्ट्र: एसटीचे तिकीट वाढणार? डिझेल दरवाढीचा फटका, सरनाईकांचे संकेत
डिझेल दरवाढीमुळे एसटीवर १२५ कोटींचा भार. महामंडळ टिकवण्यासाठी तिकीट दर वाढण्याची शक्यता, सरनाईकांचे संकेत. कर्मचाऱ्यांचे पगार, सुविधा चालू ठेवणे आवश्यक. सरकारकडून अनुदान, पण एसटीला सक्षमतेकडे वाटचाल करणे गरजेचे. 2035 पर्यंत एसटी बस इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार, राज्यभर चार्जिंग स्टेशन उभारणार.
व्यापार: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे EV ची मागणी वाढली; भारताचा वाहन उद्योग वेगाने बदलतोय...
भारतात आता नवीन वाहन खरेदी करताना ग्राहक केवळ त्याचा लूक किंवा ब्रँड पाहत नाहीत, तर त्या गाडीचा दैनंदिन आणि महिन्याचा खर्च किती येईल, याला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रिक व्हेइकल्स हा ग्राहकांसाठी एक स्मार्ट आणि पैसे वाचवणारा उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे.
पुणे: गुप्तरोगाच्या उपचारासाठी पैसे नव्हते; हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवून खंडणी उकळण्याचा कट
पुणे - हडपसर परिसरात उषाकिरण रुग्णालयात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्तरोगाच्या उपचारासाठी तब्बल सात लाख रुपयांची गरज असल्याने आरोपीने रुग्णालयातून पैसे उकळण्यासाठी हा संपूर्ण कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.
व्यापार: भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG चा मोठा करार
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात भीषण ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या संकटाचा भारतावरील परिणाम कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी आपल्या संयुक्त अरब अमिराती(UAE) दौऱ्यात LPG पुरवठा आणि धोरणात्मक तेल साठे संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
पिंपरी -चिंचवड: ‘चोऱ्या करू नको, जरा सुधार’..! म्हणताच संताप अनावर...; तरुणावर थेट पिस्तुलातून गोळीबार
पिंपरी : चोराला तरुणाने सुधारण्याचा सल्ला दिला. या कारणावरून झालेल्या वादातून चोराने त्याच्या साथीदारांसोबत मिळून गोंधळ करून पिस्तुलातून गोळीबार केला. ही घटना बुधवारी (दि. १३ मे) सायंकाळी पाच वाजता चऱ्होली येथे घडली.
व्यापार: विमान कंपन्यांना दिलासा: महाराष्ट्र सरकारचा व्हॅटमध्ये मोठा बदल.
महाराष्ट्र सरकारने एटीएफवरील व्हॅट १८% वरून ७% पर्यंत घटवला, ही सवलत नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू. इंधनावरील खर्च आणि भू-राजकीय तणावामुळे त्रस्त विमान कंपन्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे, भाडे कमी होण्याची शक्यता.
परभणी: दुधना प्रकल्पातील पाणी वाया, निधीअभावी शेतकऱ्यांचे नुकसान
दुधना प्रकल्पात १७ लाखांच्या निधीअभावी पाणी वाया जात आहे. यामुळे सिंचनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अपुऱ्या निधीमुळे जमिनीची मोजणी रखडली आहे.
व्यापार: मुलांचे भविष्य सुरक्षित करा: PPF मध्ये गुंतवणूक करून उभा करू शकता मोठा फंड
सध्याच्या महागाईच्या काळात मुलांचं उच्च शिक्षण आणि लग्न यांसाठी मोठा निधी जमा करणं पालकांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. अशा परिस्थितीत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पालकांसाठी एक अत्यंत विश्वासू आणि सुरक्षित माध्यम ठरू शकते. पीपीएफ केवळ करात बचत करत नाही, तर सरकारी सुरक्षेसह दीर्घकाळात मोठा निधी तयार करण्याचा एक उत्तम पर्याय आहे.
लातुर: NEET पेपरफुटी: लातूरमधून निवृत्त प्राध्यापक ताब्यात; पुणे कनेक्शन उघड
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरमधून निवृत्त प्रा. कुलकर्णी यांना ताब्यात घेतले. पुणे कनेक्शनचा संशय आहे. ते रसायनशास्त्र तज्ञ असून, पेपर सेटिंगमध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे. स्थानिक पोलिसांचे स्वतंत्र तपास सुरू.
व्यापार: कोट्यधीश होण्याचा सरकारी फॉर्म्युला! दरवर्षी 'इतकी' गुंतवणूक करा अन् मिळवा ₹१.०३ कोटी
निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिक विवंचनेशिवाय आणि सुखात जगायचे असेल, तर नोकरीच्या सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शेअर बाजारातील जोखीम पत्करायची नसेल आणि सुरक्षित गुंतवणुकीसह मोठा फंड हवा असेल, तर पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, म्हणजेच पीपीएफ (PPF) योजना सर्वोत्तम पर्याय मानली जाते. या सरकारी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तब्बल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारू शकता.
पुणे: हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात
पुणे - हडपसर परिसरात आढळलेल्या बॉम्ब प्रकरणात पुणे दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात नागपूर येथून एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
क्रिकेट: महिलांविरोधात आक्षेपार्ह भाषेमुळे युवराज सिंगच्या वडिलांवर गुन्हा दाखल
'लुख्खे' वेब सीरिजमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याने योगराज सिंग यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पंजाब महिला आयोगाने दखल घेतली आहे.
व्यापार: महागाई आणि कर्ज संपत्ती कमी करेल, कियोसाकी यांचा इशारा; गुंतवणुकीचा सल्ला.
'रिच डॅड पुअर डॅड' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा सावध केलं आहे. वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर "महागाई आणि कर्ज लोकांची संपत्ती हळूहळू नष्ट करेल, असं स्पष्ट विधान त्यांनी केलंय. कियोसाकी यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे.
जालना: रुईत तरुणाई संपली: जुन्या वादातून खून, तणाव वाढला.
जालन्यातील रुई येथे जुन्या वादातून १८ वर्षीय राजेश कोरकानेची हत्या. दोन संशयित ताब्यात. महिन्यातली दुसरी घटना, गावात तणाव. राजेश पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय: नीट परीक्षा पुढील वर्षापासून ऑनलाइन, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा!
पेपरफुटीच्या प्रकरणांनंतर नीट परीक्षा पुढील वर्षापासून ऑनलाइन होणार. पुनर्परीक्षा २१ जून, २०२६ रोजी. सीबीआय गैरव्यवहारांची चौकशी करत आहे. दोषींना शिक्षा देणार, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
व्यापार: गुंतवणूकदारांची चांदी! एका शेअरवर मिळणार १० बोनस शेअर्स; 'या' कंपनीची मोठी घोषणा
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बायोडीझेल आणि रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोटयार्क इंडस्ट्रीज लिमिटेड या मायक्रो कॅप कंपनीने आपल्या भागधारकांसाठी बंपर गिफ्ट जाहीर केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने १०:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यास मंजुरी दिली आहे.
व्यापार: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; शहरांनुसार तपासा आजचे नवे दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर (MCX) आज सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि महागाईच्या चिंतेमुळे मौल्यवान धातूंचे दर खाली आले आहेत.
व्यापार: पेट्रोल, डिझेलच्या दरात देशभरात वाढ; सर्वात स्वस्त, महाग कुठे मिळतं?
देशभर आज १५ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर ३.१४ रुपयांनी वधारला आहे, तर डिझेल ३.११ रुपये प्रति लिटर महाग झालं आहे. प्रीमियम पेट्रोलच्या किमतीतही राज्यानुसार वाढ झाली असून, आता हे पेट्रोल १०५.१४ ते १०७.१४ रुपये प्रति लिटर या दरम्यान मिळत आहे.
राष्ट्रीय: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. २१ जून २०२६ रोजी नीट परीक्षा देशभरात घेतली जाणार आहे. यापूर्वी घेण्यात आलेली नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आली. दरम्यान, परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याने एकूण परीक्षा घेणाऱ्या एनटीए संस्थेच्या कामावरच शंका उपस्थित होत आहे.
व्यापार: अनुपम मित्तल यांची मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांना 'WFH', वर्षभरात करणार ३०,००० लिटर पेट्रोलची बचत
प्रसिद्ध उद्योगपती आणि 'शादी डॉट कॉम'चे (Shaadi.com) संस्थापक अनुपम मित्तल सध्या सोशल मीडियावर त्यांच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच इंधन बचतीचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद देत मित्तल यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून एक दिवस 'वर्क फ्रॉम होम' देण्याची घोषणा केली आहे.
फिल्मी: रणबीर कपूरने रामनगरीत केला मोठा व्यवहार, घेतला 'इतक्या' कोटींचा प्लॉट
अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे. 'रामायण' चि दिवाळीत रिलीज होत असतानाच रणबीरच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली आहे. रणबीरने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे प्लॉट खरेदी केला आहे. याशिवाय रणबीरने याविषयी भावुक प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घ्या रणबीरच्या या व्यवहाराविषयी...
व्यापार: भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कोण आणि कसे ठरवतो? जाणून घ्या दरवाढीचे गणित...
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली की, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते. इंधन दरवाढीचा फटका केवळ गाडी चालवणाऱ्यांनाच बसत नाही, तर वाहतूक महागल्यामुळे भाजीपाला, रेशन आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूही महाग होतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की भारतात हे दर नक्की कोण ठरवते आणि दररोज सकाळी ६ वाजता किमती कशा बदलतात? जाणून घेऊया यामागचे नेमके गणित.
व्यापार: सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, युद्ध आणि महाग मूल्यांकनाच्या चिंतेमुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव असतानाही ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टॅन्लेने भारताबाबत मोठा आशावाद व्यक्त केला आहे. पुढील वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्था नव्या वाढीच्या टप्प्यात प्रवेश करेल आणि त्यामुळे सेन्सेक्स जून २०२७ पर्यंत ८९ हजारांवर पोहोचू शकतो, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.
व्यापार: नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Normal vs Premium Petrol: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर कमी करण्याबाबत केलेल्या विधानानंतर दरवाढीच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशातील तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली आहे. १५ मे पासून हे नवे दर देशभरात लागू झाले आहेत.
व्यापार: अंबानी, अदानींच्या पावलावर; एअरटेलच्या सुनील मित्तल यांचा उत्तराधिकारी कोण असणार?
भारती एअरटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील भारती मित्तल यांनी मुकेश अंबानी आणि गौतम अडाणी यांच्या पावलावर पाऊल टाकत व्यवसायाच्या उत्तराधिकाराबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. गुरुवारी कंपनीच्या अर्निंग कॉल दरम्यान मित्तल यांनी स्पष्ट केलं की, येत्या १० वर्षांच्या आत ते कंपनीची धुरा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची योजना आखत आहेत.
व्यापार: 'या' सरकारी बँकेत जमा करा ₹३,००,००० अन् गॅरंटीसह मिळवा ₹१,५८,९७४ चे व्याज...
SBI Bank FD: तुम्ही तुमची कष्टाची कमाई सुरक्षित ठिकाणी गुंतवून त्यावर खात्रीशीर परतावा मिळवू इच्छित असाल, तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. सुरक्षितता आणि हमखास परताव्यामुळे आजही मध्यमवर्गीय कुटुंबात एसबीआयच्या मुदत ठेवींवर (FD) सर्वाधिक विश्वास दर्शवला जातो.
संपादकीय: अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अविश्वासाचा आलेख दिवसेंदिवस चढताना दिसतो आहे. पक्ष चालवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ज्येष्ठ आणि तरुण यांचा समन्वय गरजेचा. पण राष्ट्रवादी अजित पवार गटात त्याचाच अभाव दिसतोय. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या साडेतीन महिन्यातच पक्षात अंतर्गत धुसफुस, नाराजी आणि अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.
राष्ट्रीय: महागाईच्या झळा, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन\
इराण-अमेरिका युद्धामुळे महागाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. भारतावरही या युद्धाचे गंभीर परिणाम झाले असून, इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर भारतातील तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली आहे. १५ मे पासून हे दरवाढ लागू झाली आहे.