Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट

Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट

Petrol Diesel Price Hike: देशभर आज १५ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर ३.१४ रुपयांनी वधारला आहे, तर डिझेल ३.११ रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 10:24 IST2026-05-15T10:21:49+5:302026-05-15T10:24:58+5:30

Petrol Diesel Price Hike: देशभर आज १५ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर ३.१४ रुपयांनी वधारला आहे, तर डिझेल ३.११ रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

Petrol and diesel prices have increased across the country but where is it cheapest and most expensive See the list | Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट

Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट

Petrol Diesel Price Hike: देशभर आज १५ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर ३.१४ रुपयांनी वधारला आहे, तर डिझेल ३.११ रुपये प्रति लिटर महाग झालं आहे. प्रीमियम पेट्रोलच्या किमतीतही राज्यानुसार वाढ झाली असून, आता हे पेट्रोल १०५.१४ ते १०७.१४ रुपये प्रति लिटर या दरम्यान मिळत आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ₹९७.७७ प्रति लिटर आहे, तर मुंबईमध्ये तो ₹१०६.६४ आणि कोलकातामध्ये ₹१०८.७४ प्रति लिटर नोंदवला गेला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ₹१०३.९० प्रति लिटर, तर बंगळुरूमध्ये तो ₹१०६.१७ प्रति लिटर आहे. याव्यतिरिक्त, जयपूरमध्ये पेट्रोलचा दर ₹१०८.१९ प्रति लिटर आणि पाटणामध्ये तो ₹१०८.५५ प्रति लिटर आहे.

सर्वात स्वस्त आणि महाग पेट्रोल कुठे?

शहरपेट्रोलची किंमतबदल
नवी दिल्ली₹97.77+3.00
मुंबई₹106.64+3.10
कोलकाता108.74+3.29
गुरुग्राम₹98.29+2.99
नोएडा₹90.04+3.30
हैदराबाद₹110.89+3.39
लखनौ₹97.58+2.85

मोठ्या शहरांचा विचार केला तर नोएडामध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त असून तेथे ९०.०४ रुपये प्रति लिटर असा दर आहे. लखनौमध्येही हा दर ९७.५८ रुपये आहे. दुसरीकडे, हैदराबाद (११०.८९ रुपये) आणि तिरुवनंतपुरम (११०.७५ रुपये) येथे पेट्रोलचे दर देशात सर्वाधिक आहेत.

सर्वात स्वत आणि महाग डिझेलची कुठे?

 

शहरडिझेलची किंमतबदल
नवी दिल्ली₹90.67+3.00
मुंबई₹93.14+3.11
चेन्नई₹95.47+3.08
गुरुग्राम₹90.77+3.00
बंगळुरु₹94.10+3.11
हैदराबाद₹98.96+3.26
लखनौ₹90.87+3.01

डिझेलच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्लीमध्ये डिझेलचा दर ₹९०.६७ प्रति लिटरवर पोहोचला आहे; तर मुंबईमध्ये तो ₹९३.१४ आणि कोलकातामध्ये ₹९५.१३ प्रति लिटर इतका आहे. चेन्नईमध्ये डिझेलचा दर ₹९५.४७ प्रति लिटर, तर बंगळुरूमध्ये ₹९४.१० प्रति लिटर नोंदवला गेला आहे.

इराण युद्धाचा बसला फटका

एप्रिल २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या, त्यावेळी भारतीय तेल कंपन्यांनी दैनंदिन दरवाढ रोखून धरली होती. मात्र, आता इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वाढत्या दबावामुळे अखेर भारतीय तेल कंपन्यांना इंधन दरवाढ करणं भाग पडलं आहे. याचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे.

 

Web Title : देशभर में पेट्रोल, डीजल की कीमतें बढ़ीं: सबसे सस्ता और महंगा शहर देखें

Web Summary : भारत में ईंधन की कीमतें बढ़ीं। पेट्रोल ₹3.14 और डीजल ₹3.11 महंगा हुआ। नोएडा में सबसे सस्ता पेट्रोल, हैदराबाद में सबसे महंगा। वैश्विक संघर्षों के कारण कच्चे तेल की कीमतों में वृद्धि को कारण बताया गया।

Web Title : Petrol, Diesel Prices Surge Nationwide: Check Cheapest and Most Expensive Cities

Web Summary : Fuel prices hiked across India. Petrol rose by ₹3.14, diesel by ₹3.11. Noida has cheapest petrol, Hyderabad most expensive. Rising crude oil prices due to global conflicts cited as reason.