Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > कोट्यधीश होण्याचा सरकारी फॉर्म्युला! दरवर्षी 'इतकी' गुंतवणूक करा अन् मिळवा ₹१.०३ कोटी

कोट्यधीश होण्याचा सरकारी फॉर्म्युला! दरवर्षी 'इतकी' गुंतवणूक करा अन् मिळवा ₹१.०३ कोटी

PPF Scheme: 'या' सरकारी योजनेत करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर व्हाल कोट्यधीश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 13:16 IST2026-05-15T13:12:29+5:302026-05-15T13:16:37+5:30

PPF Scheme: 'या' सरकारी योजनेत करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर व्हाल कोट्यधीश...

PPF Scheme: Government formula to become a millionaire! Invest 'this much' every year and earn ₹1.03 crore | कोट्यधीश होण्याचा सरकारी फॉर्म्युला! दरवर्षी 'इतकी' गुंतवणूक करा अन् मिळवा ₹१.०३ कोटी

कोट्यधीश होण्याचा सरकारी फॉर्म्युला! दरवर्षी 'इतकी' गुंतवणूक करा अन् मिळवा ₹१.०३ कोटी

PPF Scheme: निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिक विवंचनेशिवाय आणि सुखात जगायचे असेल, तर नोकरीच्या सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शेअर बाजारातील जोखीम पत्करायची नसेल आणि सुरक्षित गुंतवणुकीसह मोठा फंड हवा असेल, तर पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, म्हणजेच पीपीएफ (PPF) योजना सर्वोत्तम पर्याय मानली जाते. या सरकारी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तब्बल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारू शकता.

टॅक्स फ्री परतावा हेच सर्वात मोठे वैशिष्ट्य

PPF ही पूर्णपणे सरकारी नियंत्रण असलेली योजना असल्याने यात गुंतवलेला पैसा १००% सुरक्षित असतो. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात 'EEE' (Exempt-Exempt-Exempt) चा लाभ मिळतो. म्हणजेच, गुंतवणुकीची रक्कम, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी एकूण रक्कम या तिन्हींवर एकही रुपया टॅक्स लागत नाही.

 

PPF योजनेचे नियम आणि व्याजदर

गुंतवणुकीची मर्यादा: पीपीएफ खात्यात तुम्ही वर्षाला किमान ५०० रुपये ते कमाल १.५० लाख रुपये गुंतवू शकता.

मुदत: या खात्याचा मूळ कालावधी १५ वर्षांचा असतो. मात्र, मॅच्युरिटीनंतर तुम्ही ५-५ वर्षांच्या कालावधीसाठी हे खाते दोनदा पुढे वाढवू शकता.

सध्याचा व्याजदर: सध्या पीपीएफवर ७.१ टक्के दराने व्याज मिळत आहे.

१ कोटींचा फंड कसा तयार होणार? 

जर तुमचे वय २५ ते ३० वर्षे असेल आणि तुम्ही निवृत्तीसाठी १ कोटी रुपयांचा फंड गोळा करू इच्छित असाल, तर तुम्हाला २५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. याचे गणित खालीलप्रमाणे आहे:

वार्षिक गुंतवणूक: ₹१,५०,००० (दरमहा साडेबारा हजार रुपये)

गुंतवणुकीचा कालावधी: २५ वर्षे (१५ वर्षे मूळ मुदत + ५-५ वर्षांचे दोन एक्स्टेंशन्स)

तुम्ही गुंतवलेली एकूण मुद्दल: ₹३७,५०,०००

मिळणारे एकूण व्याज: ₹६५,५८,०००

२५ वर्षांनंतर मिळणारी एकूण रक्कम (मॅच्युरिटी): ₹१,०३,०८,००० (१.०३ कोटी रुपये)

फक्त ३७.५० लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ६५ लाखांपेक्षा जास्त व्याज मिळते आणि तुमची एकूण संपत्ती १ कोटीच्या पार जाते, हा चक्रवाढ व्याजाचा चमत्कार आहे.

तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

पीपीएफ ही सुरक्षित आणि करमुक्त परतावा देणारी सर्वोत्तम योजना असली, तरी आर्थिक तज्ज्ञांच्या मते दीर्घकाळात वाढणारी महागाई तुमच्या पैशांची खरेदीक्षमता कमी करू शकते. त्यामुळे निवृत्तीचे नियोजन करताना केवळ पीपीएफवर अवलंबून न राहता, पोर्टफोलिओमध्ये थोडी विविधता आणली पाहिजे. सुरक्षिततेसाठी पीपीएफचा पर्याय निवडतानाच, चांगल्या परताव्यासाठी इक्विटी (शेअर बाजार) किंवा म्युच्युअल फंड यांसारख्या पर्यायांचाही विचार करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

(टीप- हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांची मदत घ्या.)

Web Title : पीपीएफ: सालाना निवेश करें, ₹1.03 करोड़ पाएं, सरकारी फ़ॉर्मूला!

Web Summary : पीपीएफ योजना ₹1.03 करोड़ का रिटायरमेंट फंड बनाने का एक सुरक्षित, कर-मुक्त तरीका है। चक्रवृद्धि ब्याज का लाभ उठाते हुए 25 वर्षों तक सालाना ₹1.5 लाख का निवेश करें। विशेषज्ञ बेहतर रिटर्न के लिए और मुद्रास्फीति का मुकाबला करने के लिए पीपीएफ से परे निवेश में विविधता लाने की सलाह देते हैं।

Web Title : PPF: Invest Annually, Get ₹1.03 Crore, Government Formula!

Web Summary : PPF scheme offers a safe, tax-free way to build a ₹1.03 crore retirement fund. Invest ₹1.5 lakh annually for 25 years, leveraging compounding interest. Experts advise diversifying investments beyond PPF for better returns and to counter inflation.