‘चोऱ्या करू नको, जरा सुधार’..! म्हणताच संताप अनावर...; तरुणावर थेट पिस्तुलातून गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 15:55 IST2026-05-15T15:54:14+5:302026-05-15T15:55:01+5:30

Crime News - वादातून चोराने त्याच्या साथीदारांसोबत मिळून गोंधळ करून पिस्तुलातून गोळीबार केला.

Crime News Stop stealing..! Anger erupts as soon as he says... Pistol fired directly at the young man | ‘चोऱ्या करू नको, जरा सुधार’..! म्हणताच संताप अनावर...; तरुणावर थेट पिस्तुलातून गोळीबार

‘चोऱ्या करू नको, जरा सुधार’..! म्हणताच संताप अनावर...; तरुणावर थेट पिस्तुलातून गोळीबार

पिंपरी : चोराला तरुणाने सुधारण्याचा सल्ला दिला. या कारणावरून झालेल्या वादातून चोराने त्याच्या साथीदारांसोबत मिळून गोंधळ करून पिस्तुलातून गोळीबार केला. ही घटना बुधवारी (दि. १३ मे) सायंकाळी पाच वाजता चऱ्होली येथे घडली.

करण गुरुनाथ राठोड (वय २३, रा. चऱ्होली फाटा, हवेली, मूळ रा. शहापूर, गुलबर्गा, यादगीर, कर्नाटक) यांनी याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेखर संभाजी जाधव (२५, रा. शिक्रापूर) आणि त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण राठोड यांनी शेखर जाधव याला ‘चोऱ्या करू नको, जरा सुधार’, असा सल्ला दिला. या कारणावरून त्या दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात करण यांनी शेखरला मारहाण केली. त्या रागातून शेखरने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून करण आणि त्यांचा मित्र प्रेम या दोघांना मारहाण केली. त्यानंतर संशयिताने करण यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. परिसरात आरडाओरडा करून दहशत निर्माण करून संशयित निघून गेले.

Web Title : चोर को सुधरने की सलाह पर पिंपरी में गोलीबारी।

Web Summary : एक युवक ने चोर को सुधरने की सलाह दी, जिसके कारण हिंसक झड़प हुई। चोर ने साथियों के साथ मिलकर युवक पर हमला किया और पिस्तौल से गोली चलाई, जिससे दहशत फैल गई। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Advice to reform thief leads to shooting in Pimpri.

Web Summary : A young man advised a thief to reform, leading to a violent confrontation. The thief, along with accomplices, assaulted the man and fired a pistol, creating terror before fleeing. Police are investigating the incident.