Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > 'या' सरकारी बँकेत जमा करा ₹३,००,००० अन् गॅरंटीसह मिळवा ₹१,५८,९७४ चे व्याज...

'या' सरकारी बँकेत जमा करा ₹३,००,००० अन् गॅरंटीसह मिळवा ₹१,५८,९७४ चे व्याज...

SBI Bank FD: ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत गुंतवणुकीची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 08:12 IST2026-05-15T08:11:09+5:302026-05-15T08:12:18+5:30

SBI Bank FD: ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत गुंतवणुकीची सुविधा

SBI Bank FD: Deposit ₹3,00,000 in 'this' government bank and get interest of ₹1,58,974 with guarantee | 'या' सरकारी बँकेत जमा करा ₹३,००,००० अन् गॅरंटीसह मिळवा ₹१,५८,९७४ चे व्याज...

'या' सरकारी बँकेत जमा करा ₹३,००,००० अन् गॅरंटीसह मिळवा ₹१,५८,९७४ चे व्याज...

SBI Bank FD: तुम्ही तुमची कष्टाची कमाई सुरक्षित ठिकाणी गुंतवून त्यावर खात्रीशीर परतावा मिळवू इच्छित असाल, तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. सुरक्षितता आणि हमखास परताव्यामुळे आजही मध्यमवर्गीय कुटुंबात एसबीआयच्या मुदत ठेवींवर (FD) सर्वाधिक विश्वास दर्शवला जातो.

७ दिवसांपासून गुंतवणुकीची सुविधा

एसबीआयमध्ये ग्राहक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी (FD) करू शकतात. ही एक सरकारी बँक असल्याने तुमच्या गुंतवणुकीवर सरकारचे नियंत्रण असते, ज्यामुळे हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो.

व्याजदर काय आहेत?

बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजाचे दर निश्चित केले आहेत:

अल्प मुदत: ७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर ३.०५% ते ३.६५% व्याज मिळते.

मध्यम मुदत: ४६ ते २१० दिवसांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ४.९०% ते ६.२५% व्याज दिले जात आहे.

दीर्घ मुदत: ५ ते १० वर्षांच्या एफडीवर बँक ६.०५% ते ७.१५% पर्यंत आकर्षक परतावा देत आहे.

६ वर्षांच्या गुंतवणुकीवर पैशांचा पाऊस...

बँकेच्या विशेष योजनेनुसार, जर तुम्ही ३ लाख रुपये ६ वर्षांसाठी गुंतवले, तर तुम्हाला मिळणारे फायदे थक्क करणारे आहेत:

सामान्य नागरिक: ३ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ६ वर्षांनंतर सुमारे १,३०,१२० रुपये व्याज मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीवर एकूण ४,३०,१२० रुपये हातात येतील.

ज्येष्ठ नागरिक: ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळत असल्याने, त्यांना ३ लाखांवर १,५६,२७६ रुपये व्याज मिळेल. एकूण रक्कम ४,५६,२७६ रुपये मिळतील.

अति ज्येष्ठ नागरिक: या वर्गाला सर्वाधिक फायदा मिळत असून, ३ लाखांच्या गुंतवणुकीवर तब्बल १,५८,९७४ रुपये फिक्स व्याज मिळेल. म्हणजेच, मॅच्युरिटीनंतर त्यांना एकूण ४,५८,९७४ रुपये मिळतील.

Web Title : एसबीआई एफडी: ₹3 लाख जमा करें, ₹1,58,974 ब्याज की गारंटी!

Web Summary : एसबीआई 7 दिनों से 10 वर्षों तक की आकर्षक एफडी दरें प्रदान करता है। ₹3 लाख का निवेश 6 वर्षों के लिए करें और वरिष्ठ नागरिक ₹1,58,974 तक ब्याज अर्जित कर सकते हैं, जो इसे एक सुरक्षित निवेश बनाता है।

Web Title : SBI FD: Invest ₹3 Lakh, Earn Guaranteed ₹1,58,974 Interest!

Web Summary : SBI offers attractive FD rates, from 7 days to 10 years. Invest ₹3 Lakh for 6 years and senior citizens can earn up to ₹1,58,974 interest, making it a secure investment.