शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बुटात लपवलेली चावी, फ्लॅट उघडून चोरट्याने मारला ५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:14 IST

पाळत ठेऊन चोरी

सांगली : फ्लॅट बाहेर ठेवलेल्या बुटात लपवलेली चावी घेऊन चोरट्याने आरामात फ्लॅट उघडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाट व लॉकर फोडून दागिन्यांसह रोख रक्कम असे एकूण ५ लाख ४४ हजारांची चोरी केली. ही घटना गावभागातील संग्राम चौक जवळील जय अपार्टमेंटच्या फ्लॅट नं १३ मध्ये सोमवारी दुपारी घडली. याबाबत किरण केसरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या गाव भागातील संग्राम चौक जवळील जय अपार्टमेंटमध्ये १३ क्रमांकाचा फ्लॅट किरण गजानन केसरे (वय ५०, व्यवसाय खासगी नोकरी) यांचा आहे. ते सोमवारी सकाळी फ्लॅटला कुलूप घालून बाहेर गेले होते. यावेळी फ्लॅटच्या बाहेर असलेल्या बुटात फ्लॅटची चावी होती. ती चावी घेऊन अज्ञात चोरट्याने फ्लॅटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. तसेच हॉलमधील तिजोरीचे दरवाजे व लॉकर त्याने फोडले.

त्यामध्ये असलेले सोन्याचे कानातील टॉप्स, नेकलेस, मणी, टिक्की, जेंट्स व लेडीज अंगठी, दोन लहान अंगठी, कानातील रिंग, वेढणी, कानातील झुबे, दोन बोरमाळ असे एकूण साडेसात तोळ्याहून अधिकचे सोन्याचे दागिने, १० ग्रॅम वजनाचे चांदीचे जास्वंदी फूल आणि रोख २५ हजार रक्कम असा एकूण ५ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. सदरची घटना सोमवारी सकाळी ११ ते दुपारी अडीचच्या दरम्यान घडली. दुपारनंतर किरण हे घरी आल्यावर फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे त्यांना समजले.

याबाबत केसरे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी पंचनामा करुन डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट पथक यांनी तपासणी केली. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पाळत ठेऊन चोरी

फ्लॅटच्या बाहेर ठेवलेल्या बुटात फ्लॅटची चावी होती. ती चावी घेऊन चोरट्याने फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. बुटातील चावी संदर्भात कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तींना माहिती असणार किंवा पाळत ठेऊन फ्लॅटची चावी कोठे असते हे माहिती करुन घेऊन चोरट्याने चोरी केली आहे. या दिशेने पोलिसांचा तपास सुरु आहे.