चौकशीच्या रागातून कार्यालयात घुसून अधिकाऱ्यावर हल्ला, सांगलीत सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 13:07 IST2026-05-19T13:06:51+5:302026-05-19T13:07:04+5:30

रक्ताळलेल्या अवस्थेत आंधळे यांनी सांगली शहर पोलिस ठाणे गाठले

Anger over investigation leads to attack on officer in Sangli Crime against social worker | चौकशीच्या रागातून कार्यालयात घुसून अधिकाऱ्यावर हल्ला, सांगलीत सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा

चौकशीच्या रागातून कार्यालयात घुसून अधिकाऱ्यावर हल्ला, सांगलीत सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा

सांगली : येथील धर्मादाय कार्यालयात निरीक्षक ज्ञानेश्वर शिवनाथ आंधळे (वय ४७, रा. पालवी अपार्टमेंट, घनशाम नगर) यांच्यावर जुन्या चौकशीच्या रागातून कार्यालयात घुसून शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. याबाबत सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी ज्ञानेश्वर आंधळे (वय ४७) हे सांगली कार्यालयात निरीक्षक असून त्यांच्याकडे मिरज, जत व पलूस तालुक्यांचा पदभार आहे. सोमवारी ते नेहमीप्रमाणे काम करत असताना दुपारी चारच्या सुमारास संशयित कैलास पाटील तिथे आले. त्यानी आंधळे यांना ‘तू खरसुंडी देवस्थानच्या चौकशीत पैसे खाल्ले आहेस’, असा आरोप केला.

आंधळे यांना लाचलुचपत व खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जिवंत जाळण्याची धमकी दिली. कार्यालयातील इतर कर्मचारी मध्यस्थी करत असतानाच पाटील यानी टेबलवरील संगणकाची वायर ओढून, कागदपत्रे अंगावर फेकत आंधळे यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर धारदार शस्त्राने वार केला.

रक्ताळलेल्या अवस्थेत आंधळे यांनी सांगली शहर पोलिस ठाणे गाठले, तेथून पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. उपचारानंतर आंधळे यांनी दिलेल्या वर्दी जबाबावरून सांगली शहर पोलिसांनी कैलास पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : सांगली में पूछताछ विवाद में सामाजिक कार्यकर्ता ने अधिकारी पर हमला किया।

Web Summary : सांगली में, एक सामाजिक कार्यकर्ता, कैलाश पाटिल ने पुरानी पूछताछ को लेकर दान कार्यालय के निरीक्षक ज्ञानेश्वर अंधले पर हमला किया। पाटिल ने कथित तौर पर अंधले पर भ्रष्टाचार का आरोप लगाया, उसे धमकी दी और हथियार से हमला किया। पुलिस ने पाटिल के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Social activist attacks officer in Sangli over inquiry dispute.

Web Summary : In Sangli, a social activist, Kailas Patil, attacked charity office inspector Dnyaneshwar Andhale over an old inquiry. Patil allegedly accused Andhale of corruption, threatened him, and attacked him with a weapon. Police have registered a case against Patil.