शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील व्यापाऱ्याला सव्वादोन कोटींचा गंडा, अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 15:10 IST

ड्रग्ज, मनी लाँड्रिंगमध्ये अडकल्याचा कांगावा 

सांगली : ड्रग्ज आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकल्याचा कांगावा करीत सांगली येथील एका व्यापाऱ्यास दोघा भामट्यांनी तब्बल २ कोटी २५ लाख २ हजार १३३ रुपयांना गंडा घातला. डिजिटल अरेस्टचा हा प्रकार असल्याचेच निष्पन्न होत असून, अज्ञात दोघांविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अभिनंदन सुभाष निलाखे (रा. अथर्व बंगला, वसंतनगर, सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी निलाखे हे व्यावसायिक आहेत. त्यांना शनिवार, दि. २६ मे २०२४ रोजी दुपारी २:१५ च्या सुमारास विक्रम शर्मा या व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर लागोपाठ अन्य दोन क्रमांकांवरून त्यांना फोन आले. संबंधित भामट्यांनी फिर्यादी अभिनंदन निलाखे यांना तुमचा फोन काही वेळात बंद होणार असल्याचे सांगितले. तसेच, निलाखे यांना, तुमचे आधारकार्ड हे ड्रग्ज आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात वापरले आहे. तुमच्यावर मोठा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, तुमचा फोन जम्मू-काश्मीर येथे ॲक्टिव्ह असून, तुम्हाला अटक होऊन तुरुंगवास होऊ शकतो, असे सांगितले. हा प्रकार मार्च ते जून-२०२४ या कालावधीत घडला. अटक टाळण्यासाठी फिर्यादी निलाखे यांनी भामट्यांनी दिलेल्या बॅँक खात्यावर तब्बल २ कोटी २५ लाख २ हजार १३३ रुपये त्यांना आयसीआयसी बँक शाखेच्या माध्यमातून पाठविले, परंतु कालांतराने निलाखे यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस