शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर येथील चोरीला गेलेली दुचाकी ११ महिन्यांनी सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:29 IST

BikeChori CrimeNews Ratnagiri- कोल्हापूर, राजारामपुरी येथून ११ महिन्यांपूर्वी चोरीला गेलेल्या एक्सेज दुचाकी मालकाचा लांजा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना दुचाकी परत केली आहे. तपास करणाऱ्या महिला पोलीस नाईक प्रमिला गुरव यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे कोल्हापूर येथील चोरीला गेलेली दुचाकी ११ महिन्यांनी सापडलीलांजा पोलिसांनी शोधला दुचाकीचा मालक, गाडी मिळाल्याचा आनंद

लांजा : कोल्हापूर, राजारामपुरी येथून ११ महिन्यांपूर्वी चोरीला गेलेल्या एक्सेज दुचाकी मालकाचा लांजा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना दुचाकी परत केली आहे. तपास करणाऱ्या महिला पोलीस नाईक प्रमिला गुरव यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.लांजा शहरातील हेरिटेज इमारतीच्या पार्किंग जागेमध्ये दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी काळ्या रंगाची नवीन एक्सेज गाडी येथील रहिवासी यांच्या निदर्शनास आली. इमारतीच्या कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर तांबे यांनी लांजा पोलीस स्थानकात यांची माहिती दिली. त्यानंतर महिला पोलीस नाईक प्रमिला गुरव यांनी बेवारस असलेली दुचाकी ताब्यात घेतली.

याचा तपास करताना त्यांनी रत्नागिरी आरटीओ यांना पत्रव्यवहार करून गाडीचा नंबर मिळविला. त्यानंतर कोल्हापूर येथील आरटीओ व कोल्हापुरातील गुन्हा अन्वेषण विभागाशी पत्रव्यवहार करून गाडीच्या नंबरवरून गाडीमालकाची माहिती मिळविली. या नंबरवरून कोल्हापुरातील राजोपाध्येनगर येथील शब्बीर इमाम परस यांच्या मालकीची ही गाडी असल्याची माहिती मिळाली. त्यांनी दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद दि. १० मार्च २०२० रोजी दिली होती.कोल्हापूर येथून ही गाडी चोरून लांजा शहरातील हेरिटेज इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी ठेवून पोबारा केला होता. गाडीचा मालक लक्षात आल्यानंतर दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्रव्यवहार करून आपल्या मालकीची असलेली दुचाकी आपल्या ताब्यात घेण्याचे पत्र पाठविण्यात आले. त्यानंतर मालक शब्बीर परस यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यांचे कॉन्स्टेबल अनिल चिले यांना सोबत घेऊन शनिवारी लांजा पोलीस स्थानकात दाखल झाले. त्यानंतर त्यांना ही गाडी ताब्यात देण्यात आली.

 

टॅग्स :bikeबाईकCrime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर