युती शासनाने कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित केले आहे. हे धरण कर्जत तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. त्याचे पाणी कर्जत तालुक्यालाच मिळाले पाहिजे या मागणीसाठी मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सादर केली आहे. ...
मांडवा आणि रेवस ही रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात व्यस्त असणारी बंदरे आहेत. फरक इतकाच आहे की, मांडवा बंदरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रवास करतात, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य चाकरमानी प्रवास करताना दिसून येतात. ...
दिघी पोर्ट व्यवस्थापनाकडून कामगारांना नेहमीच सापत्न वागणूक दिली जात आहे. आता दिघी पोर्ट प्रशासनाने ७५ कामगारांचे दोन महिन्यांचे फरकबिल व दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) थकवून ठेवले आहे. ...
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने कोंढाणे धरणास मंजुरी दिली होती. धरणाचे काम सुरूही झाले होते. मात्र त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना-भाजपा युतीने या धरणात भ्रष्टाचार झाला आहे असे भासवून धरणास विरोध दर्शवून काम बंद पाडले होते. ...
श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सरपंचपदी बिनविरोध निवडून आलेल्या प्रमिला मेंदाडकर व ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ खरगावकर यांच्याविरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. ...
पनवेल तालुक्यातील पालीदेवद सुकापूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा समितीने योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने दिला आहे. असे असताना संबंधितावर कारवाई करण्यास रायगड जिल्हा परिषद प्रशासन टाळाटाळ करत आहे. ...
उरण परिसरात समुद्रकिनारी आणि निसर्गाच्या कुशीत केगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत माणकेश्वर मंदिर आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी वार्षिक यात्रा भरते व तेथे दीपमाळ व मंदिरावर असंख्य दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो. ...
नवीन पनवेल येथील पंचशीलनगरला लागून असलेल्या रेल्वेच्या फलाट रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून सोमवारी तीन मुलींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने खड्ड्यातील पाणी उपसण्याचे काम सुरू केले आहे. ...