अमेरिकेत नोकरी करीत असलेला नेरळ येथील स्थानिक तरुण गुरु वारी १९ मार्च रोजी नेरळ येथे घरी परत आल्याची माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी सर्व प्रशासकीय यंत्रणा त्याच्या घरी पोहोचली. ...
चवदार तळे स्मारकाबाहेरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी जमा होण्यास मज्जाव करणारा मोठा फलक नगर परिषदेने लावला होता. तसेच पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. ...
कोरोना विषाणूच्या प्रसारापासून नागरिकांना बाधित होण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना गर्दी करू नका, प्रवास करू नका, असे आवाहन करीत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र नागरिक आजही सरकारी कार्यालयात गर्दी करीत असून कामे करून घेण्यासाठी आग्रही आहेत. ...
‘कोरोनो’ संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे आदेश प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद गवई यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. ...
कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लादलेले आहेत. मात्र अलिबाग तालुक्यातील थळ-चाळमाळ परिसरातील मासेमारी करणाऱ्या समाजाला आपल्या न्याय्य हक्कासाठी एकजुटीने यावे लागले. ...