Video: 'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं', राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 10:59 IST2026-05-09T10:58:28+5:302026-05-09T10:59:28+5:30

वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे यांच्यासह काही गुंडांनी हा हल्ला केल्याचा दावा लवांडे यांनी केला आहे.

'You didn't want to talk to our Guruvara', NCP Pawar faction spokesperson Vikas Lawande throws ink at him | Video: 'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं', राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक

Video: 'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं', राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक

पुणे : तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं, ते आमचं सर्वस्व आहे. परत जर आमच्या गुरुवर्यांना काही बोलला ना तर लक्षात ठेव असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाहीफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

दशक्रिया विधीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गेलेल्या लवांडे यांना परतत असताना निर्जनस्थळी अडवून हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे यांच्यासह काही गुंडांनी हा हल्ला केल्याचा दावा लवांडे यांनी केला आहे. या घटनेत त्यांच्यावर शाहीफेक करत मारहाण करण्याचाही प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर खळबळ उडाली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं? 

दशक्रिया विधीनिमित्त आयोजित कार्यक्रमावरून  परतत असताना निर्जनस्थळी अडवून लवांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. संग्राम भंडारे यांच्यासह काही जणांनी लवांडे यांना अडवल्याचे व्हिडिओमधून दिसते आहे. तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं, ते आमचं सर्वस्व आहे. परत जर आमच्या गुरुवर्यांना काही बोलला ना तर लक्षात ठेव असं म्हणत त्यांच्यावर संग्राम आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या दोंघांकडून शाईफेक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोपही लवांडे यांनी केला आहे.  

Web Title : गुरु पर टिप्पणी के लिए NCP के विकास लांडे पर स्याही फेंकी गई

Web Summary : पुणे में NCP के विकास लांडे पर एक सम्मानित गुरु के खिलाफ कथित तौर पर टिप्पणी करने के बाद स्याही फेंकी गई। लांडे का आरोप है कि वारकरी संप्रदाय के सदस्यों ने दशक्रिया विधि कार्यक्रम के दौरान उन पर हमला किया। पुलिस मामले की जांच कर रही है, जिससे आक्रोश फैल गया है।

Web Title : Ink Thrown at NCP's Vikas Lavande for Remarks Against Guru

Web Summary : NCP's Vikas Lavande was attacked with ink in Pune after allegedly making remarks against a revered guru. Lavande alleges Warakari Sampraday members assaulted him during a Dashkriya Vidhi event. Police are investigating the incident, which has sparked outrage.