शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

.... कसं का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 20:12 IST

... त्यामुळे देशात,राज्यात बदनामी झाली. ती मी सहन करत पराभवाची जबाबदारीदेखील स्वीकारली....

ठळक मुद्देमाळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित कार्यकर्ता मेळावामाळेगांव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत महाविकासआघाडी पॅटर्न

बारामती : माझ्या १९९१ पासुन आजपर्यंतच्या राजकीय कार्यकाळात दोनवेळा माळेगाव कारखाना विरोधी विचारांच्या गटाकडे गेला.मात्र, त्याचा माझ्या खासदारकी,आमदारकीसह जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र, त्यामुळे देशात,राज्यात बदनामी झाली. ती मी सहन करत  पराभवाची जबाबदारी देखील स्वीकारली. पण आम्ही देखील चार चार वेळा मुख्यमंत्रीपद आणि कसं का असेना चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिलेले आहोत अशी मिश्कीलपणे टिप्पणी करत अजित पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पवार यांच्या वक्तव्याला दादांनी भल्या सकाळी देवेंद्र फडवणीस यांच्याबरोबर घेतलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेचे धागेदोरे होते. त्यामुळे पवार यांच्यासह उपस्थितांमध्ये हशा पिकला.  माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मताधिक्य मिळविण्यासाठी मनापासुन काम करावे,असे आवाहन पवार यांनी केले. माळेगावमध्ये सत्ताबदल झाल्यावर त्या काळात ८ ते ९ महिन्यात तीन तीन व्हाईस चेअरमन बदलण्यात आले.त्यावेळी त्यांचे बहुमत होते त्याबदद्ल मला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या विचारांचे संचालक त्यांच्यापासुन बाजुला गेल्यावर त्यांना अपात्र करण्यात आले. लोकशाहीत हे बरोबर नाही.त्यांच्या विचारांचे सहकारमंत्री होते,म्हणुन असे राजकारण करण्यात आले. राज्याप्रमाणेच माळेगांव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सहकारी कारखाना निवडणुकीत महाविकासआघाडी पॅटर्न राबविण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. निवडणुकीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारGovernmentसरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकBJPभाजपा