शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

पुण्याला पैसे देताना भाजपचा दुजाभाव मात्र, मी निधी कमी पडू देणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 9:35 PM

पुणे जिल्ह्याला सन २०१९-२० च्या जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्यात मंजूर रक्कमेपैकी तब्बल ९८ कोटी रुपयांचा निधी कमी दिल्याचे पवार म्हणाले.

पुणे : भाजप सरकारने विकास कामांसाठी निधी वाटप करताना दुजाभाव केल्याचा आरोप राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. २७) पुण्यात केला. पुणे जिल्ह्याला सन २०१९-२० च्या जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्यात मंजूर रक्कमेपैकी तब्बल ९८ कोटी रुपयांचा निधी कमी दिल्याचे पवार म्हणाले. जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्यात निधी वाटप करताना एक सुत्र निश्चित झाले आहे. त्यामुळे कोणतेही सरकार आले किंवा गेले तरी या सूत्रानुसारच वाटप झाले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 पुणे विभागातील पाच जिल्ह्यांचा सन २०२०-२१ या वर्षासाठीचा जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्याची आढावा बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, संबंधितजिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पवार म्हणाले,  गेल्यावर्षी पुणे जिल्ह्यासाठी ६१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यापैकी ५२१ कोटी रुपये मिळाले. त्यावेळी मंत्री,आमदार कोण होते याचा उल्लेख करून पवार म्हणाले आज बैठकीला खासदार गिरीश बापट उपस्थित नाहीत, नाही तर ही गोष्ट मी त्यांच्या निदर्शनास आणली असती.आता माझ्याकडे राज्याचा अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री अशी दुहेरी जबाबदारी आहे. यामुळे पुणे जिल्ह्यासाठी  निधी कमी पडू देणार नाही.  नियमानुसार निधी मंजूर करताना पाच-दहा कोटींचा फरक समजू शकतो, पण, पुण्यासारख्या जिल्ह्याला ९८ कोटी रुपये कमी मिळाले हे योग्य नाही.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणBJPभाजपा