Rahul Gandhi on CBI Chief Selection: देशातील सर्वात मोठी तपास संस्था असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या नवीन संचालकांच्या निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या संपूर्ण निवड प्रक्रियेला पक्षपाती ठरवत त्यातून स्वतःला वेगळे केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनीविरोधी पक्षनेता हा सरकारचा रबर स्टँप नाही, असं स्पष्ट केले.
मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सीबीआय संचालकांच्या निवडीसाठी समितीची बैठक पार पडली. या समितीत पंतप्रधान मोदी, भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांचा समावेश होता. या बैठकीनंतर राहुल गांधींनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, ही प्रक्रिया लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याने मी असहमती दर्शवली आहे.
निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचे गंभीर आरोप
राहुल गांधींनी ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप केला. उमेदवारांचे महत्त्वाचे रेकॉर्ड्स, सेल्फ-अप्रेजल रिपोर्ट आणि ३६०-डिग्री रिपोर्ट त्यांना वेळेवर उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. बैठकीत पहिल्यांदाच ६९ उमेदवारांचे रेकॉर्ड्स तपासण्यास सांगण्यात आले, जे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले. सरकार सीबीआयचा वापर राजकीय विरोधक आणि पत्रकारांना लक्ष्य करण्यासाठी करत असल्याचा दावा गांधींनी केला आहे.
"मी माझे कर्तव्य टाळणार नाही"
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींनी कठोर भूमिका मांडली आहे. "मी केवळ सोपस्कार पूर्ण करण्यासाठी या पक्षपाती प्रक्रियेचा भाग होऊ शकत नाही. माझ्या घटनात्मक जबाबदारीचा भाग म्हणून मी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकत आहे," असे त्यांनी म्हटले. यापूर्वी देखील त्यांनी मे २०२५ आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये निवड प्रक्रियेबाबत सूचना दिल्या होत्या, मात्र सरकारने त्याची दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोण आहेत शर्यतीत?
पुढील सीबीआय संचालकांसाठी १९८९ ते १९९२ बॅचच्या आयपीएस अधिकाऱ्यांची नावे विचारात घेतली जात आहेत. यामध्ये रॉ प्रमुख पराग जैन, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, शत्रुजित सिंह कपूर, सीआरपीएफ प्रमुख जी. पी. सिंह, दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांचा समावेश आहे.
Web Summary : Rahul Gandhi boycotted the CBI chief selection, citing a biased process. He alleged crucial candidate information was withheld, making fair evaluation impossible. Gandhi asserted he won't be a rubber stamp in a process he deems undemocratic. Names of potential CBI directors are under consideration.
Web Summary : राहुल गांधी ने सीबीआई प्रमुख के चयन का बहिष्कार करते हुए प्रक्रिया को पक्षपातपूर्ण बताया। उन्होंने आरोप लगाया कि उम्मीदवारों की महत्वपूर्ण जानकारी रोकी गई, जिससे उचित मूल्यांकन असंभव हो गया। गांधी ने कहा कि वह एक ऐसी प्रक्रिया में रबर स्टैंप नहीं बनेंगे जिसे वे अलोकतांत्रिक मानते हैं। संभावित सीबीआई निदेशकों के नामों पर विचार किया जा रहा है।