शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
4
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
5
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
6
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
7
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
8
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
9
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
10
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
13
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
14
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
15
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
16
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
17
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
18
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
19
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
20
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हाला लाडकी बहीण नको; सुरक्षा योजना सुरु करा', पुण्यातील संतप्त महिलांची सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:37 IST

आम्ही दिवसभर पोटापाण्यासाठी कामाला जातो, मुली घरी असतात, आम्हाला त्या सुरक्षित पाहिजेत

पुणे : आम्हाला लाडकी बहीण नको, महिलांसाठी सुरक्षा योजना सुरु करा, अशी मागणी पुण्यातील महिलांनी सरकारकडे लोकमतशी बोलताना केली आहे. पर्वती येथे आजोबाकडून ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. त्यानंतर संतप्त जमावाने रात्री याभागात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी गृहिणी महिलांनी मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

आम्हाला लाडकी बहीण नको. आमच्यासाठी आणि आमच्या मुलींसाठी सुरक्षा योजना सुरु करा. सद्यस्थितीत कोणत्याही लहान मुली सुरक्षित नसल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. आता कितीतरी प्रकरणे रोज घडत आहेत. आम्ही दिवसभर पोटापाण्यासाठी कामाला जातो. आमच्या मुली शाळेत जातात. नंतर घरी असतात. त्यामुळे आता आमच्या पोरी सुरक्षित पाहिजे अशी मागणी या पालकांनी केली आहे. 

 पुणे शहरातील पर्वती पायथा परिसरातील जय भवानी नगर येथे अत्यंत संतापजनक व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच आजोबांकडून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.आरोपीचे नाव अंबादास यलम्मा जाधव (वय अंदाजे 62 वर्षे, रा. जय भवानी नगर) असे असून तो पीडित मुलीचा आजोबा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या आजोबावर  लैंगिक अत्याचार करणाऱ्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटना घडत असताना परिसरातील नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपीला पकडले आणि संतप्त जमावाने त्याला चोप दिला. या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी निलायम पूल ते पर्वती पायथा दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. नसरापूर येथील अलीकडील घटनेमुळे आधीच संतप्त असलेले नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. दरम्यान, पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेची आई पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune women demand safety, not schemes, after molestation attempt.

Web Summary : Following an attempted molestation of a 9-year-old girl by her grandfather in Pune, outraged women demanded safety measures, not just schemes. They protested, highlighting the vulnerability of girls and calling for stricter protection, as current measures fail to ensure their security.
टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीagitationआंदोलनladki bahin yojanaलाडकी बहीण योजना