Pune Crime Marathi : "मी घरी पोहोचले तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. अंगावर नखांचे ओरखडे होते. माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. त्याला फाशी द्या." हा आक्रोश आहे पुण्यातील पर्वती भागात अत्याच्याराचा प्रयत्न झालेल्या चिमुकलीच्या आईचा. सख्ख्या आजोबानेच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या या घटनेने पुणे हादरून गेलं आहे.
पर्वती भागात घडलेल्या या घटनेने आजोबा आणि नातीच्या नात्यालाच काळिमा फासली आहे. चिमुकलीची आई म्हणाली, "आम्ही दोघे दिवसभर कामावर असतो. मी कपड्याच्या दुकानात कामाला असते. माझा नवरा रिक्षा चालवतो."
...तेव्हा मुलीच्या अंगावर कपडेच नव्हते
"मी रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास कामावरून घरी आले, तेव्हा मुलीने मला हा सगळा प्रकार सांगितला. तिच्या अंगावर कपडे नव्हते, तसेच अंगावर नखांचे ओरखडे होते. माझ्या बापानेच माझ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. त्याला फाशी दिली पाहिजे", असे चिमुकलीची आई म्हणाली.
"मुलगी म्हणाली की यापूर्वीही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी मात्र आम्हाला हे कळलं नाही. मुलगी म्हणाली की आजोबांनी आधीही माझ्यासोबत असंच केलं होतं. तुम्ही कामावर गेल्यावर तात्या मला ओढून ओढून जवळ घ्यायचे. तेव्हा मी बाहेर पळून गेले, असे ती म्हणाली."
मुलीचे वडील म्हणाले, आधी खाऊ दिला आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला
"मी रिक्षा चालवतो. मी काल दिवसभर रिक्षा चालवत होतो. आमचा मुलगा घरात झोपला होता. संध्याकाळी सात वाजता हे घडलं. सासऱ्याने वर्षभरापूर्वी माझा मोबाईल चोरला होता. तेव्हा मी त्याला घरातून हाकलले होते", असे मुलीचे वडील म्हणाले.
"नंतर माझ्या सासऱ्याने कुठे घर घेतलं, हेच मला माहिती नाही. तो जवळपास राहतोय, हेच आम्हाला माहिती नव्हते. काल त्याने मुलीला खाऊ दिला. लहान मुलांना काही कळत नाही. त्यानंतर त्याने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला", असे चिमुकलीचे वडील म्हणाले.
Web Summary : In Pune, a mother accuses her father of attempting to rape her young daughter. The child reported the assault, revealing previous incidents. The parents, who work long hours, are devastated and demand the harshest punishment for the grandfather's alleged actions.
Web Summary : पुणे में, एक माँ ने अपने पिता पर अपनी छोटी बेटी के साथ बलात्कार करने का प्रयास करने का आरोप लगाया। बच्ची ने हमले की सूचना दी, जिसमें पिछली घटनाओं का पता चला। लंबे समय तक काम करने वाले माता-पिता तबाह हो गए हैं और दादा के कथित कृत्यों के लिए कड़ी से कड़ी सजा की मांग कर रहे हैं।