‘जॉनी जॉनी येस पापा’ ही इंग्रजीतील कविता तुमच्या सर्वांच्या परिचयाची असेलच. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील लहान मुलं ही कविता आवडीने म्हणतात. मात्र ही कविता मुलांना खोटं बोलायला शिकवते, असा अजब दावा उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याययांनी केला आहे. आज कानपूरमध्ये शिक्षणमित्रांच्या मानधनातील वाढीसंदर्भात आयोजित कार्यक्रमात बोलताना उपाध्याय यांनी हा दावा केला आहे. तसेच काही हिंदी कवितांचं उदाहरण देत शिक्षकांनी अभ्यासक्रमांसोबतच संस्कार देणारी व्यवस्था विकसित करावी,असं आवाहनही त्यांनी केलं.
मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी सांगितले की, जेव्हा शिक्षक गुरूच्या भूमिकेत जातो, तेव्हा तो शिक्षणासोबत चांगले संस्कार देऊ शकतो. ‘जॉनी जॉनी येस पापा’ या कवितेतील इटिंग शुगर नो पापासारख्या ओळी मुलांना लहानपणापासूनच खोटं बोलायला शिकवतात.
ते पुढे म्हणाले की, पाश्चात्य संस्कृती असलेल्या इंग्रजी कविता ह्या आजच्या पिढीला अत्यंत आवश्यक असलेले संस्कार देऊ शकत नाहीत. यावेळी उपाध्याय यांनी ज्या कविता ऐकून आधीच्या पिढ्या मोठ्या झाल्या अशा उत्तम जीवनमूल्यं असलेल्या काही हिंदी कवितांची उदाहरणंही दिली.
Web Summary : Uttar Pradesh minister claims 'Johnny Johnny Yes Papa' teaches children to lie. He advocates for incorporating values through Hindi poems, criticizing Western influence on education and emphasizing the importance of instilling good values in students.
Web Summary : उत्तर प्रदेश के मंत्री का दावा है कि 'जॉनी जॉनी यस पापा' बच्चों को झूठ बोलना सिखाती है। उन्होंने हिंदी कविताओं के माध्यम से मूल्यों को शामिल करने की वकालत की, शिक्षा पर पश्चिमी प्रभाव की आलोचना की और छात्रों में अच्छे मूल्यों को स्थापित करने के महत्व पर जोर दिया।