शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:01 IST

Iraq Oil Offer : इराकने जागतिक बाजारपेठेपेक्षा ७०% स्वस्त कच्चे तेल विकण्याची ऑफर दिली आहे. बसरा ग्रेड क्रूडसाठी ३१०० रुपये किंमत निश्चित.

बगदाद: जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना इराकने जगाला थक्क करणारी ऑफर दिली आहे. अमेरिकन नाकाबंदी आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराकने प्रति बॅरल ३,१०० रुपये दराने कच्चे तेल विकण्याची घोषणा केली आहे. सध्या जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा दर सुमारे ११,००० रुपये असताना इराकने दिलेली ही सवलत ७० टक्क्यांहून अधिक आहे.

बसरा ग्रेड ऑईलसाठी अट काय?इराकच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी खरेदीदारांना 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मध्ये यावे लागेल. इराकचे 'बसरा ग्रेड' तेल, जे अत्यंत उच्च दर्जाचे मानले जाते, ते इराकच्या स्वतःच्या टँकर्समधून पुरवले जाईल. एका बॅरलमध्ये १५९ लिटर तेल असते, या हिशोबाने इराकची ही किंमत जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उडवून देणारी ठरू शकते.

इराकची चिंता आणि अमेरिकेची भूमिकासंयुक्त अरब अमिरातीने 'ओपेक' मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने इराकच्या तेल निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराकची ९० टक्के अर्थव्यवस्था ही खनिज तेलावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे, इराकच्या तेल क्षेत्रात हॅलिबर्टन आणि एसएलबी यांसारख्या मोठ्या अमेरिकन कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे इराकचा असा विश्वास आहे की, अमेरिका या तेल टँकर्सना सागरी सुरक्षा पुरवेल, ज्यामुळे खरेदीदारांचा धोका कमी होईल.

जागतिक परिणामजर इराकचा हा प्रयत्न यशस्वी झाला, तर जागतिक स्तरावर इंधनाचे दर कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, होर्मुज सामुद्रधुनीतील वाढता लष्करी तणाव आणि अमेरिकेची यावरील अधिकृत प्रतिक्रिया यावर बरेच काही अवलंबून असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Iraq Offers Cheap Oil: $3100 Per Barrel, One Condition!

Web Summary : Iraq offers crude oil at $3100 per barrel, a 70% discount, if buyers come to the Strait of Hormuz. This move, amidst global tensions and high oil prices, could significantly impact global fuel costs, dependent on Hormuz security and US response.
टॅग्स :Crude Oilखनिज तेलIranइराणWarयुद्धUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर