शहरं
Join us  
Trending Stories
1
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
2
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
3
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
4
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
5
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
7
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
8
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
9
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
10
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
11
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
12
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
13
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
14
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
15
घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
16
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
17
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
18
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
19
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
20
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:52 IST

एका शिक्षकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. या हत्या प्रकरणात मृत्यू झालेल्या शिक्षकाची पत्नीच मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एका शिक्षकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. या हत्या प्रकरणात मृत्यू झालेल्या शिक्षकाची पत्नीच मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याच्या लालसेपोटी आणि कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह चार आरोपींना अटक केली आहे.

भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोडपेठ परिसरातील हनुमान मंदिराजवळ ही धक्कादायक घटना घडली. २ मे रोजी सकाळी ४६ वर्षीय शिक्षक रवींद्र कुलमेथे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पाहिलं की, मृताच्या गळ्यात प्लास्टिकची पिशवी आणि त्यावर पांढरा दुपट्टा घट्ट बांधलेला होता, ज्यामुळे ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं.

हत्येचा कट रचल्याची कबुली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाजवळ सापडलेल्या फोनच्या कॉल डिटेल्सवरून मृताची ओळख गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रहिवासी रवींद्र तुळशीराम कुलमेथे अशी पटली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून हत्या झाल्याचं समोर आलं. तपासादरम्यान पोलिसांनी मृताची ४२ वर्षीय पत्नी दीपमाला कुलमेथे हिची चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने हत्येचा कट रचल्याची कबुली दिली.

१ लाखाची दिली सुपारी

पोलीस तपासात समोर आलं की, दीपमाला तिच्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळली होती. नागपुरात उपचारादरम्यान तिची भेट वर्षा परचाके नावाच्या महिलेशी झाली, जिने तिला पतीच्या हत्येचा सल्ला दिला. त्यानंतर दीपमालाने वर्षा परचाके, सोनू उर्फ ​​प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांच्या मदतीने सुमारे १ लाखाची सुपारी देऊन पतीच्या हत्येचा कट रचला.

अशी केली हत्या

२९ एप्रिल रोजी दीपमालाने आपल्या पतीला दिघोरी येथील एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी बोलावलं. दुसऱ्या दिवशी ३० एप्रिल रोजी आरोपी सोनू कालोकर आणि नाझीर अंसारी कार घेऊन पोहोचले. दीपमालाने आपल्या पतीला कारमध्ये बसवून आरोपींच्या ताब्यात दिले. आरोपींनी त्यांना घोडपेठच्या निर्जन भागात नेले आणि कारमध्येच गळा आवळून त्यांची हत्या केली.

सरकारी नोकरीसाठी घेतला जीव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी आरोपींनी दीपमालाला फोन करून 'काम झालं' अशी माहिती दिली होती. तपासात असंही समोर आलं आहे की, पती-पत्नी अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते. पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल, या हेतूने पत्नीने हे क्रूर पाऊल उचलले. पोलिसांनी ३ मे रोजी दीपमाला कुलमेथे आणि वर्षा परचाके यांना वरोरा येथून अटक केली, तर सोनू उर्फ ​​प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांना ४ मे रोजी पहाटे नागपूरमधून ताब्यात घेतले. आरोपींकडून हत्येसाठी वापरलेली कार आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wife Orchestrates Husband's Murder for Government Job; Hires Contract Killers

Web Summary : In Chandrapur, a teacher's wife masterminded his murder, driven by greed for his government job and marital discord. She paid contract killers to eliminate him. Police arrested four individuals, including the wife and another woman, in connection with the crime.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस