Embassy Developments NCLT News: रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी एम्बेसी डेव्हलपमेंट्सनं (Embassy Developments) एक मोठी कायदेशीर लढाई जिंकली आहे. 'नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्यूनल'नं (NCLAT) कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया (Insolvency Proceedings) सुरू करण्याचा जुना निर्णय पूर्णपणे रद्द केला. या निर्णयामुळे कंपनीवरील दिवाळखोरीचे संकट आता कायमचे टळलं असून, गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
नेमकं प्रकरण काय?
९ डिसेंबर २०२५ रोजी 'नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल' (NCLT) च्या दिल्ली खंडपीठाने एम्बेसी डेव्हलपमेंट्स विरुद्ध कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रिया (CIRP) सुरू करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला कंपनीनं NCLAT मध्ये आव्हान दिलं होतं. न्यायालयानं आता आपला अंतिम निकाल देताना जुना आदेश फेटाळून लावला असून हे प्रकरण पूर्णपणे बंद केलंय.
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
एम्बेसी डेव्हलपमेंट्सचे चेअरमन जीतू विरवानी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. "NCLAT चा हा निकाल आमची बाजू सत्य असल्याचं सिद्ध करतो. हे एक जुनं प्रकरण होतं, ज्यामध्ये 'इंडियाबुल्स रिअल इस्टेट'च्या एका जुन्या पत्राला चुकीच्या पद्धतीने 'कॉर्पोरेट गॅरंटी' मानून सादर करण्यात आलं होतं. या कायदेशीर लढाईचा आमच्या कंपनीच्या कामकाजावर किंवा कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही," असं ते म्हणाले.
प्रकल्पांवर कोणताही परिणाम नाही
कंपनीनं अधिकृतपणे स्पष्ट केलंय की, या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेदरम्यान त्यांच्या व्यवसायावर किंवा कोणत्याही गृहनिर्माण प्रकल्पावर कोणताही परिणाम झालेला नाही. कंपनीचं कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहील. या निर्णयामुळे घर खरेदीदार आणि भागधारकांच्या हिताचं रक्षण झालं असून त्यांच्या मनातील अनिश्चितता दूर झाली आहे.
शेअरची कामगिरी
एम्बेसी डेव्हलपमेंट्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज (६ मे २०२६) जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. कंपनीचा स्टॉक सुमारे २०% वधारून ₹५८.३० वर पोहोचला. दिवाळखोरीचा आदेश रद्द झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्याने स्टॉक 'अपर सर्किट'च्या जवळ पोहोचला. कायदेशीर वादात अडकलेली असतानाही कंपनीच्या व्यवसायानं मोठी गती घेतली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान कंपनीने उत्कृष्ट कामगिरी केली.
या वर्षात कंपनीनं ₹४,६०० कोटींची विक्रमी 'प्री-सेल्स' नोंदवला आहे. चौथ्या तिमाहीत (Q4) कंपनीने आपल्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी तिमाही बुकिंग मिळवल्याची माहिती समोर आलीये. या ऐतिहासिक निर्णयानंतर आणि विक्रमी व्यावसायिक कामगिरीनंतर एम्बेसी डेव्हलपमेंट्स आता रिअल इस्टेट मार्केटमध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी सज्ज झाली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Embassy Developments won a legal battle as NCLAT overturned bankruptcy proceedings. The company's stock surged 20%, reaching the upper circuit. They reported record pre-sales of ₹4,600 crore and the largest quarterly booking, strengthening its market position. Operations remain unaffected.
Web Summary : एम्बेसी डेवलपमेंट्स ने कानूनी लड़ाई जीती क्योंकि एनसीएलएटी ने दिवालिया कार्यवाही को पलट दिया। कंपनी का स्टॉक 20% उछल गया, जो ऊपरी सर्किट तक पहुंच गया। उन्होंने ₹4,600 करोड़ की रिकॉर्ड प्री-सेल्स और सबसे बड़ी तिमाही बुकिंग दर्ज की, जिससे बाजार में उनकी स्थिति मजबूत हुई। संचालन अप्रभावित रहता है।