शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:29 IST

७९ वर्षांच्या डॉ. संतोष गोयल यांनी इंग्रजीत सांगितले होते की, त्यांनी खडकवासला येथील 'एनडीए'मध्ये तीन वर्षे शिकवले आहे.

'एनडीए'मध्ये शिकवण्याचे काम केल्याचा दावा करणारे आग्रा येथील ७९ वर्षीय डॉ. संतोष गोयल यांना लष्करी पोलिस घेऊन गेले आहेत.  त्यांनी खडकवासला येथील आर्मी एज्युकेशन कोरमध्ये ३ वर्षे शिकवल्याचा दावा केला होता. जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त अजय मिश्र यांनी त्यांचा इंग्रजी बोलतानाचा एक व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने या प्रकरणाची दखल घेतली. लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना नगला पदी येथील एका घरातून घेऊन गेले असून सध्या त्यांच्यावर मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला

तीन दिवसांपूर्वी जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त अजय मिश्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये वृद्ध संतोष गोयल यांनी सांगितले होते की, त्यांनी १९७१ मध्ये इंग्रजी विषयात पीएचडी पूर्ण केली होती. त्यानंतर त्यांची निवड नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये झाली होती. एनडीएमध्ये त्यांनी ३ वर्षे इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी शिकवलेले विद्यार्थी आता लेफ्टनंट आणि कर्नल बनले आहेत. व्हिडिओमध्ये त्यांनी इंग्रजी कवी आणि लेखकांच्या ऐतिहासिक नाटकांचा उल्लेख केला, तसेच व्याकरणाच्या विविध विषयांवर आपली पूर्ण कमांड असल्याचे सांगितले.

व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी नगला पदी येथे गेले. तिथे एका घरात संतोष गोयल होते. लष्करी जवानांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांना आपल्या गाडीतून सोबत घेऊन गेले. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गोयल यांना मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय, लष्कर त्यांच्याबद्दल अधिक माहिती गोळा करत आहे आणि त्यांनी एनडीएमध्ये शिक्षक म्हणून काम केले होते की नाही, या दाव्याची सत्यता जाणून घेत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये संतोष गोयल यांनी जीएसटी अधिकाऱ्याला सांगितले होते की, ते खडकवासला, पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये शिक्षक होते. नोकरीत असताना त्यांचे डोळे निकामी झाले, त्यामुळे त्यांना 'बोर्ड आउट' करण्यात आले. जर त्यांनी १५ वर्षांची नोकरी पूर्ण केली असती, तर आज त्यांना ७० ते ८० हजार रुपये पेन्शन मिळाली असती, पण त्यांनी फक्त ३ वर्षेच नोकरी केली. सध्या ते अत्यंत साधे आणि गरिबीचे जीवन जगत आहेत. ते एका मंदिरात राहून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री झोपण्यासाठी एका घरात जातात. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत आहे, पण त्यांचे शिक्षण आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. 

डॉ. संतोष गोयल यांच्यावर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांची शस्त्रक्रिया होणार आहे. नेत्रतज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. सुरुवातीला अनेक चाचण्या केल्या जातील. त्यांच्यावर कडक वैद्यकीय देखरेख ठेवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NDA Teacher Claim: Army Takes Dr. Goyal for Treatment

Web Summary : Dr. Santosh Goyal, claiming to have taught at NDA, was taken by military police after a video surfaced. He is now receiving treatment at a military hospital as the army investigates his claims.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSocial Viralसोशल व्हायरल