Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:24 IST

या गाण्यातील आपल्या डान्स मूव्ह्स दाखवण्यासाठी राकेश बेदी प्रचंड उत्सुक असल्याचे या व्हिडिओतून दिसून येत आहे.

'धुरंधर'सिनेमातील जमील जमालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहेत. 'धुरंधर'च्या दोन्ही भागांमध्ये आपल्या कॉमेडी टॅलेंटने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर, आता राकेश बेदी चक्क डान्स फ्लोअरवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे, बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेहीसोबत ते एका गाण्यात थिरकताना दिसणार आहेत.

राकेश बेदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा एक बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी नोरा फतेहीचे कौतुक करताना तिला भारताची 'सर्वात मोठी स्टार' आणि 'महान अभिनेत्री' म्हटले आहे. या गाण्यातील आपल्या डान्स मूव्ह्स दाखवण्यासाठी राकेश बेदी प्रचंड उत्सुक असल्याचे या व्हिडिओतून दिसून येत आहे.

दुसरीकडे, नोरा फतेहीने देखील राकेश बेदींच्या डान्सचे भरभरून कौतुक केले आहे. व्हिडिओमध्ये नोरा म्हणते की, "सर, तुमच्यासोबत काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तुम्ही खूप छान डान्स केला आणि मी तुमच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला आहे". हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रत्येक लग्नसराईत हे गाणे वाजवले जाईल असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.

राकेश बेदी यांनी 'धुरंधर' चित्रपटात 'जमील जमाली' या पाकिस्तानी राजकारण्याची भूमिका साकारली होती जो नंतर एक भारतीय गुप्तहेर असल्याचे समोर येते. या भूमिकेसाठी आणि विशेषतः त्यांच्या 'बच्चा है तू मेरा...' या संवादासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. आता अभिनयानंतर राकेश बेदींचे डान्स कौशल्य पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rakesh Bedi dances with Nora Fatehi; BTS video shared

Web Summary : Rakesh Bedi, famed for 'Jameel Jamali,' will be seen dancing with Nora Fatehi. Bedi shared a BTS video, praising Fatehi. Nora also lauded Bedi's dancing and expressed excitement for the song's release.
टॅग्स :राकेश बेदीनोरा फतेहीबॉलिवूड