Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 10:33 IST

Gold Silver Price Today: मध्य पूर्वेत बदलणाऱ्या परिस्थितीचा परिणाम भारताच्या कमोडिटी बाजारावरही पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर ६ मे २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली.

Gold Silver Price Today: मध्य पूर्वेत बदलणाऱ्या परिस्थितीचा परिणाम भारताच्या कमोडिटी बाजारावरही पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर ६ मे २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. आज सोन्याचा भाव १,५१,८०९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,५०,४९९ रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. सोने-चांदीची ही दरवाढ लग्नसराईच्या काळात खरेदीदारांसाठी मोठ्या धक्क्यासारखी आहे.

आज किमतीत किती वाढ झाली?

मंगळवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,४९,८३८ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत २,४४,४२० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. कालच्या बंद भावाच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीत १,९७१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीच्या किमतीत ६,०७९ रुपये प्रति किलोची वाढ झाली.

सोने-चांदीत तेजीचं कारण काय?

आज जागतिक आणि देशांतर्गत कमोडिटी बाजारात तेजी दिसून येत आहे, ज्याचे मुख्य कारण मध्य पूर्वेचा तणाव संपण्याचे संकेत हे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की, त्यांना इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी अंतिम करारावर चर्चा करायची आहे. यासाठी त्यांनी केवळ हल्ल्यांवर बंदी घातली नाही, तर 'स्ट्रेट ऑफ होर्मूज'मधून जहाजं नेण्यासाठी बनवलेल्या 'फ्रीडम प्रोजेक्ट'वरही तात्पुरती बंदी घातली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण आणि कमोडिटी बाजारात मजबुती पाहायला मिळत आहे.

आजचा चांदीचा भाव

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किमतीत जास्त घसरण पाहायला मिळत होती. त्याचप्रमाणे, आज सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. विविध शहरांतील चांदीचे भाव खालीलप्रमाणे आहेत:

दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू: २,६५,००० रुपये प्रति किलो.चेन्नई: २,७०,००० रुपये प्रति किलो.

सोन्याचे नवे दर काय?

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and silver prices surge amid Middle East tensions easing.

Web Summary : Gold and silver prices soared on MCX, driven by easing Middle East tensions and potential US-Iran talks. Gold reached ₹1,51,809/10g, and silver ₹2,50,499/kg, impacting wedding season buyers. Silver prices varied across cities, with Chennai highest at ₹2,70,000/kg.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक