06 May, 26 10:38 AM
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ
मध्य पूर्वेत बदलणाऱ्या परिस्थितीचा परिणाम भारताच्या कमोडिटी बाजारावरही पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर ६ मे २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. आज सोन्याचा भाव १,५१,८०९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,५०,४९९ रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे.
06 May, 26 10:16 AM
खलिस्तानी लिबरेशन आर्मीने घेतली स्फोटाची जबाबदारी
पंजाबच्या जालंधरमधील स्फोटाची जबाबदारी खलिस्तानी लिबरेशन आर्मीने घेतली. मंगळवारी रात्री पंजाब फ्रंटियर येथील BSF मुख्यालयाजवळ स्फोट झाला. त्यानंतर हा संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात आला आहे. या घटनेबाबत अधिक माहिती गोळा करण्यासाठी आणि तपासात पंजाब पोलिसांना मदत करण्यासाठी 'राष्ट्रीय तपास यंत्रणे'चे (NIA) एक पथक सध्या जालंधरच्या दिशेने रवाना झाले आहे.
06 May, 26 09:31 AM
स्पर्धेतील नाव की, पुन्हा धक्का देणार; पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री कोण होणार?
भाजपाने पश्चिम बंगालमध्ये दणदणीत विजय मिळवला. पहिल्यांदाच भाजपाचा मुख्यमंत्री होणार असून, कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विधिमंडळ नेता अर्थात मुख्यमंत्री निवडीची जबाबदारी सोपवण्यात आली असून, स्पर्धेत असलेल्या नेत्यांपैकी एका संधी देणार की, इतर राज्यामधील धक्का तंत्र पश्चिम बंगालमध्येही बघायला मिळणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
सुवेंदू अधिकारी, शमिक भट्टाचार्य, अग्निमित्रा पोल, रुपा गांगुली या नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. पण, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, गुजरात या राज्यांप्रमाणेच भाजपा चर्चेत नसलेल्या नेत्याला या पदी बसवणार, याबद्दल चर्चा सुरू आहे.
06 May, 26 09:22 AM
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधीच इराणचे परराष्ट्रमंत्री पोहोचले चीनमध्ये
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अममेरिकेने इराणच्या मालवाहू जहाजांना लक्ष्य केले. त्यामुळे पश्चिम आशियातील युद्ध संघर्ष वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशातच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची हे चीनमध्ये पोहोचले.
एका शिष्टमंडळासोबत अरागची चीन दौऱ्यावर असून, ते चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १४ आणि १५ मे रोजी चीने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीन दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वीच इराणचे मंत्री चीनमध्ये पोहोचले आहेत.
06 May, 26 09:22 AM
'प्रोजेक्ट फ्रीडम' तात्पुरते बंद करण्याचे ट्रम्प यांचे आदेश
US इराण यांच्यातील संघर्षात होर्मुझ स्ट्रेटबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मध्य पूर्वेत व्यावसायिक जहाजांना सुरक्षा देण्यासाठी सुरू केलेल्या प्रोजेक्ट फ्रीडम या नौदल मोहिमेला स्थगिती देण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. परंतु इराणी बंदरावरील नाकेबंदी जारी राहील असंही अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
06 May, 26 09:21 AM
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे कार्यालय जाळले, दुसरे बुलडोझरने पाडले
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या विविध भागांतून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. आसनसोल उत्तर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाला आग लावण्यात आल्याची घटना घडली आहे, तर दुसरीकडे कोलकात्याच्या न्यू मार्केट परिसरात बुलडोझरने टीएमसीचे युनियन कार्यालय जमीनदोस्त केल्याने तणाव वाढला आहे.
06 May, 26 09:14 AM
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
06 May, 26 09:13 AM
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अग्निमित्रा पॉल यांच्या नावाची जोरदार चर्चा
06 May, 26 09:13 AM
पालघरमध्ये १३ वर्षीय मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, अघोरी पूजेसाठी बोलावून राक्षसी कृत्य
मोठ्या बहिणीचा मासिक पाळीनंतरही रक्तस्त्राव थांबत नसल्याने कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी एका भोंदूबाबाला संपर्क केला. त्याने अघोरी पूजा करावी लागेल आणि गावठी औषध देतो म्हणून भेटायला बोलावले. कुटुंबीय पीडित मुलीसह भोंदूबाबाला भेटायला गेले आणि त्याच वेळी त्याने पीडितेला बाजूला नेऊन एका स्मशानभूमीजवळ बलात्कार केला.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
06 May, 26 09:12 AM
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ