शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 09:41 IST

Nasrapur case: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त करत या प्रकरणातील आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो, किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करून संपवावं अशी मागणी केली होती. त्यावरून आता वकील असीम सरोदे यांनी अशा चिथावणीखोर  वक्तव्यांमुळे राज ठाकरेंविरोधात गुन्हाही दाखल  होऊ शकतो असा दावा केला आहे. 

नसरापूर येथे एका नराधम इसमाने साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा तातडीने देण्याची मागणी सर्वच स्तरांमधून होत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त करत या प्रकरणातील आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो, किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करून  संपवावं अशी मागणी केली होती. त्यावरून आता वकील असीम सरोदे यांनी अशा चिथावणीखोर  वक्तव्यांमुळे राज ठाकरेंविरोधात गुन्हाही दाखल  होऊ शकतो असा दावा केला आहे. 

राज ठाकरे  यांनी नसरापूर प्रकरणातील आरोपीला शिक्षा देण्याबाबत केलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देताना असीम सरोदे यांनी सांगितले की, नसरापूर प्रकरणातील आरोपीला १०१ टक्के फाशीची शिक्षाच होणार आहे. मात्र याप्रकरणी काहीजण बेताल वक्तव्य करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातील आरोपीला चौरंगा करा, त्याला हाल हाल करून मारा अशा प्रकारची मागणी प्रवीण तरडे, राज ठाकरे आदींकडून केली जात आहे. या प्रकरणातील  आरोपीला ठार मारणाऱ्याला आमदार, खासदार करा, असेही प्रवीण  तरडे यांनी म्हटले  आहे. मग प्रवीण तरडे हे स्वत:च का आरोपीला मारायला जात नाहीत? असा सवालही सरोदे यांनी विचारला.

ते पुढे म्हणाले  की, राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य असल्या तरी कायद्याचं एक तत्त्व आहे. या प्रकरणातील आरोपीला त्याची बाजू मांडू दिली पाहिजे.  तसेच कायद्याच्या माध्यमातूनच आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. राज ठाकरे यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने अशा प्रकारची विधानं करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी चिथावणी देणं योग्य नाही. त्यामुळे त्यांनी अशा  प्रकारची विधानं करू नयेत, अशी समज पोलिसांनी राज ठाकरे यांना दिली पाहिजे. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हाही नोंदवला i, असेही सरोदे यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते राज ठाकरेर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल नसरापूर प्रकरणी आपली रोखठोक भूमिका मांडली स्पष्ट  केली होती. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली, असे सांगत राज ठाकरे यांनी या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं, असा सल्ला दिला होता. सरकार अशा घटनांमध्ये जेंव्हा फास्टटट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेंव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही ? असा  सवाल राज  ठाकरे यांनी उपस्थित केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray could face charges over Nasrapur case: Advocate

Web Summary : Lawyer Aseem Sarode claims Raj Thackeray's call for vigilante justice in the Nasrapur rape-murder case could lead to charges. He criticized Thackeray's inflammatory statements, urging police to caution him against inciting public violence, despite understanding his sentiment.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAsim Sarodeअसिम सराेदेPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी