Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 09:33 IST

अभिनेत्री अचानक स्क्रीनवरुन गायब का झाली? आता काय करते?

'पिया बसंती रे', 'मौला मेरे मौला मेरे' अशा काही सुपरहिट गाण्यांमध्ये आणि अनेक हिंदी सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री नौहीद सेरुसी चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. क्रांती रेडकरसोबत तिने कॉमेडी रील्स असतात. मात्र नौहीद स्क्रीनपासून लांब का गेली याचा खुलासा तिने केला आहे. नौहीदला काम मिळणं बंद का झालं हेही तिने सांगितलंय. काय म्हणाली अभिनेत्री?

नौहीदने काल इन्स्टाग्रामवर एक कँडीड व्हिडीओ शेअर केला. यात तिने बिग स्क्रीनपासून लांब जाण्याचं कारण सांगितलं. नौहीदला चाहत्याने एक प्रश्न विचारला की 'तुझे काही आगामी सिनेमे किंवा शोज येणार आहेत का?' यावर उत्तर देताना ती म्हणाली, "एकाच दगडात दोन पक्षी मारुया का? कारण हा मला सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. खरंतर तर सध्या सिनेमात काम करण्यासाठी सर्वात चांगला काळ आहे. पण या क्षेत्रात एखादा प्रोजेक्ट साईन करताना ते त्यात किसींग सीन आणि इंटिमेट सीनसाठीही तुम्ही कंफर्टेबल आहात अशी अट असते. मला वाटतं आजकाल तर उगाचच गरज नसताना फालतूमध्ये हे लोक किसींग सीन वगैरे टाकतात. सॉरी पण मला नाही वाटत स्क्रीनवर आपण किसींग करताना चांगले दिसू. किंवा त्यांना ते नीट शूट करता येत नसेल, मला काही माहित नाही."

ती पुढे म्हणाली, "माझ्या या निर्णयामुळे माझं प्रोफेशनल करिअर धोक्यात आलं. अनेक प्रोजेक्ट्स हातातून गेले. मी हो किंवा नाही म्हणायच्या आधीच रिजेक्ट व्हायचे. कारण मी किंसींग पार्टसाठी कंफर्टेबल नव्हते."

निर्माते पैसे अडकवून ठेवतात

नौहीद व्हिडीओत मानधनाबद्दल म्हणाली, "निर्माते अनेकदा पूर्ण पैसे देत नाहीत. कॉन्ट्रॅक्ट साईन करताना जी आश्वासनं दिलेली असतात ती पूर्णच होत नाहीत. फालतू कारणं दिली जातात. त्यामुळे कलाकाराला राहिलेली ठराविक रक्कम मिळतच नाही. उदाहरणार्थ, कल्पना करा की माझं शूटिंग संपलंय आणि निर्मात्याने २५ टक्के रक्कम होल्ड केली आहे.  मला अनेकदा ते २५ टक्के मिळालेलेच नाहीत. 'अरे पिक्चर चाललाच नाही, चांगला झाला नाही' अशी उत्तरं निर्मात्यांकडून आली आहेत. पण मी तर माझं काम केलं ना? तुम्हाला माहित आहे की आपल्यात कॉन्ट्रॅक्ट झालं आहे पण मी कुठे यांच्याविरोधात केस वगैरे करु? मला ते शक्यच नव्हतं. 

इन्स्टाग्राम हेच माझं कार्यक्षेत्र

ती पुढे म्हणाली, "मी अशा व्यक्तींपैकी कधीच नव्हते जी कलाकार, निर्माते किंवा त्यांच्या ठराविक गटात वावरेल. अभिनयाव्यतिरिक्त माझे संपूर्ण वेगळे आयुष्य होते. आणि त्याच कारणामुळे माझ्या वाट्याला नेहमीच दुय्यम किंवा 'रद्दी' भूमिका यायच्या. कोणाची तरी बहीण, कोणाची तरी वहिनी किंवा कोणाची तरी... पण मला अशा भूमिका करण्यात रस नव्हता. हे करण्यापेक्षा मी काम न करणेच जास्त पसंत केले असते…. मला जाणीव झाली की इन्स्टाग्राम हेच माझे खरे कार्यक्षेत्र आहे. मला खूप आनंद आहे की मी तुम्हाला शोधलं आणि तुम्ही मला शोधलं."

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड