रितेश देशमुखच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'राजा शिवाजी' हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या ऐतिहासिक चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. मात्र, या भूमिकेसाठी विद्या बालन ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती, अशी माहिती आता समोर आली आहे.
या चित्रपटातील 'बडी बेगम' या भूमिकेसाठी रितेश देशमुखने सर्वात आधी अभिनेत्री तब्बूला विचारणा केली होती. फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, तब्बूला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती, परंतु तारखांच्या कारणाने तिने या प्रोजेक्टला नकार दिला. त्यानंतर रितेशने विद्या बालनशी संपर्क साधला आणि तिने लगेचच या भूमिकेसाठी होकार दिला.
विशेष म्हणजे, तब्बूने केवळ 'राजा शिवाजी'च नव्हे, तर 'भूल भुलैया ३' या चित्रपटाची ऑफरही नाकारली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया २' मध्ये मंजुलिका आणि अंजुलिका अशा दुहेरी भूमिका साकारल्यानंतर, तिसऱ्या भागात त्याच प्रकारचे काम करण्यात काही नवीन आव्हान नसल्याचे वाटल्याने तिने हा निर्णय घेतला. योगायोगाने, 'भूल भुलैया ३' मध्येही तब्बूच्या जागी विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांची वर्णी लागली.
विद्या बालनने साकारलेली बडी बेगम ही व्यक्तिरेखा विजापूर सल्तनतीतील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होती. या भूमिकेत विद्या बालनने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, जेनेलिया देशमुख, फरदीन खान आणि बोमन इराणी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Web Summary : Tabu initially refused the 'Raja Shivaji' role due to scheduling conflicts. Vidya Balan then accepted, portraying Badi Begum. She captivated audiences in the historical drama alongside Sanjay Dutt and others. The film is a box office success.
Web Summary : 'राजा शिवाजी' के लिए तब्बू ने तारीखों के कारण भूमिका अस्वीकार की। फिर विद्या बालन ने बड़ी बेगम की भूमिका निभाई। संजय दत्त और अन्य कलाकारों के साथ ऐतिहासिक नाटक में उन्होंने दर्शकों को मोहित किया। फिल्म सफल रही है।