भारतीय बाजारपेठेत १५० सीसी सेगमेंटमध्ये दबदबा असणाऱ्या यामाहाने आता भविष्यातील इंधनाचा विचार करून आपली नवीन यामाहा फॅक्टर १५० (Yamaha Factor 150 BlueFlex) ब्राझीलमध्ये लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही बाईक १०० टक्के इथेनॉलवर (E100) चालू शकते, ज्यामुळे पेट्रोलच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळू शकतो.
डिझाइनच्या बाबतीत यामाहा फॅक्टर १५० ही भारतातील लोकप्रिय 'FZ-S Fi V4' शी मिळतीजुळती आहे. यात मस्क्युलर फ्युएल टँक, एलईडी हेडलॅम्प आणि डिजिटल एलसीडी कन्सोल मिळतो. मात्र, फॅक्टर १५० मध्ये अधिक सुटसुटीत लूक देण्यात आला आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्स
इंजिन: १५० सीसी, एअर-कूल्ड, सिंगल सिलेंडर.
शक्ती : पेट्रोलवर १२.२ पीएस, तर १००% इथेनॉलवर (E100) १२.४ पीएस.
टॉर्क: १३ एनएम.
खास वैशिष्ट्य: याला 'ब्लूफ्लेक्स' तंत्रज्ञान म्हणतात, ज्यामुळे तुम्ही पेट्रोल, इथेनॉल किंवा या दोन्हीचे मिश्रण वापरू शकता.
भारतात कधी येणार?
सध्या ही बाईक ब्राझीलमध्ये लाँच झाली असून तिची किंमत भारतीय रुपयांनुसार सुमारे ३.५४ लाख रुपये आहे. भारतात रस्ते वाहतूक मंत्रालयाने अलिकडेच E85 आणि E100 इथेनॉल मिश्रणाबाबत मसुदा जाहीर केला आहे. त्यामुळे यामाहा ही बाईक लवकरच भारतीय गरजांनुसार बदल करून भारतात लाँच करण्याची दाट शक्यता आहे.
Web Summary : Yamaha launched Factor 150 BlueFlex in Brazil, running on 100% ethanol. Similar to FZ-S Fi V4, it features BlueFlex tech, allowing petrol or ethanol mix. India launch expected after adaptation.
Web Summary : यामाहा ने ब्राजील में फैक्टर 150 ब्लूफ्लेक्स लॉन्च की, जो 100% इथेनॉल पर चलती है। FZ-S Fi V4 के समान, इसमें ब्लूफ्लेक्स तकनीक है, जो पेट्रोल या इथेनॉल मिश्रण की अनुमति देती है। अनुकूलन के बाद भारत में लॉन्च की उम्मीद है।