नसरापूर घटनेने लोकांचा भावनांचा झालेला अद्रेक कमी होण्याआधीच अकोला जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. एका ६० वर्षाच्या नराधमाने एका १० वर्षाच्या चिमुकलीवर अनेक वेळा अत्याचार केले. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात हा संतापजनक कृत्य घडले आहे.
पीडित मुलीचे आईवडील शेतमजूर आहेत. ते मुलीला घरी ठेवूनच शेत मजुरीसाठी जातात. मात्र, गेल्या आठवड्यात आईवडील कामावर गेल्यानंतर ६० वर्षाच्या आरोपीने मुलीला पकडलं आणि तिच्यावर अत्याचार केला.
चिमुकलीवर चार-पाच वेळा अत्याचार
पोलिसांनी सांगितले की, ५ मे रोजी सायंकाळी मुलीचे आईवडील घरी आले. त्यावेळी तिने घाबरतच तिच्यासोबत होत असलेल्या कृत्याबद्दल आईवडिलांना सांगितले. हे ऐकून आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
त्यांनी तातडीने चान्नी पोलीस स्टेशन गाठले आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. घराशेजारी राहणाऱ्या आरोपीने सलग चार-पाच वेळा तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
आरोपीच्या शोधासाठी चार पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपी जंगलाच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाली. लवकरच आरोपीला अटक करून, असे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले.
कारंजातही अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
कारंजा (जि. वाशिम) तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ५ मे रोजी कारंजा शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, २ मे रोजी सायंकाळी पीडिता घरी एकटी असताना गावातील आरोपी घरात शिरला. त्याने तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला व अत्याचाराचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून मनीष विष्णुपंत गुल्हाने (वय ५५) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Web Summary : In Akola, a 10-year-old girl was repeatedly raped by a 60-year-old neighbor while her parents were at work. Police are searching for the accused, who fled towards the jungle. A similar incident occurred in Karanja, where a minor girl was assaulted.
Web Summary : अकोला में, एक 10 वर्षीय लड़की के साथ 60 वर्षीय पड़ोसी ने बार-बार बलात्कार किया, जब उसके माता-पिता काम पर थे। पुलिस आरोपी की तलाश कर रही है, जो जंगल की ओर भाग गया। करंजा में भी ऐसी ही घटना हुई, जहां एक नाबालिग लड़की पर हमला किया गया।