बिहारची राजधानी पाटणा येथे सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राजकीय गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा भव्य शपथविधी सोहळा ७ मे रोजी ऐतिहासिक गांधी मैदानात पार पडणार आहे. मात्र, बुधवारी झालेल्या पावसाने या सोहळ्याच्या तयारीवर पाणी फेरले असून संपूर्ण मैदान चिखलमय झाले आहे.
भाजप-जेडीयूमध्ये '५०-५०' चा फॉर्म्युला
सम्राट चौधरी यांचे सरकार स्थापन होऊन २२ दिवस उलटल्यानंतर हा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आणि जेडीयू यांच्यात '५०-५०' चा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याकडे संपूर्ण बिहारचे लक्ष लागले आहे. 'सम्राट सेना' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी भाजपने मोठी ताकद लावली आहे.
दिग्गजांची उपस्थिती आणि सुरक्षेचा वेढा
या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. व्हीव्हीआयपींच्या सुरक्षिततेसाठी गांधी मैदानात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, पावसाने घातलेल्या व्यत्ययामुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.
पावसाचे आव्हान
गांधी मैदानात वॉटरप्रूफ पेंडॉल आणि सजावटीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, पावसामुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाकडून चिखल उपसण्याचे आणि मैदान पुन्हा व्यवस्थित करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. जर मैदानातील चिखल सुकला नाही, तसेच पेंडॉलची दुरावस्था झाली तर एवढी तयारी करणे कठीण जाणार आहे. यामुळे सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी बंदिस्त सभागृहात करावा लागणार आहे.
Web Summary : Heavy rain in Patna threatens Bihar's cabinet expansion ceremony scheduled at Gandhi Maidan. The BJP-JDU '50-50' formula hangs in balance, with VIP security challenged by the muddy conditions, potentially forcing a venue change.
Web Summary : पटना में भारी बारिश से गांधी मैदान में बिहार मंत्रिमंडल विस्तार समारोह खतरे में है। भाजपा-जदयू का '50-50' फॉर्मूला अधर में लटका है, वीआईपी सुरक्षा कीचड़ से बाधित, संभावित रूप से स्थान परिवर्तन हो सकता है।