1 / 8उन्हाळ्याचे दिवस असल्याने एसीच्या वापरात वाढ झाली आहे; मात्र एसीचा अतिवापर आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो. ज्यामुळे कोरडी त्वचा, श्वसनाचे विकार, सांधेदुखी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यासारखे धोके संभवतात. 2 / 8अस्थमा किंवा अॅलर्जी असलेल्या लोकांना एसीमुळे त्रास वाढू शकतो. वातानुकूलित यंत्राचा अतिवापर किंवा सतत एसीमध्ये राहणे, श्वसनासंबंधी विकारांना कारणीभूत ठरू शकते. यामुळे घसा कोरडा पडणे, शिंका येणे, खोकला येणे, नाक बंद होणे अशा समस्या निर्माण होतात.3 / 8 खूप कमी तापमानात बसल्याने स्नायूंमध्ये कडकपणा येतो. त्यामुळे पाठदुखी, मानदुखी आणि सांधेदुखीच्या तक्रारी वाढतात. विशेषतः संधिवात असलेल्या रुग्णांना हा त्रास अधिक होतो. एसी असलेल्या बंद खोलीत ताज्या हवेचा अभाव असतो. दीर्घकाळ अशा वातावरणात राहिल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होऊन सतत डोकेदुखी आणि थकवा जाणवतो.4 / 8एसी फिल्टर नियमित स्वच्छ करावे, खोलीत हवेचा प्रवाह कायम ठेवायला हवा, एसीसोबत पंखाही वापरायला हवा. श्वसनाचे विकार असतील, तर एसी वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.5 / 8एसीचे फिल्टर्स वेळेवर स्वच्छ न केल्यास त्यात धूळ, बुरशी आणि बॅक्टेरिया साचतात. हे कण हवेद्वारे शरीरात गेल्याने फुफ्फुसांचे संसर्ग होऊ शकतात. एसीचे तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान ठेवावे, एसीमधून थेट उन्हात किंवा उन्हातून थेट एसीत येणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील, एसीचे फिल्टर्स नियमितपणे स्वच्छ करावेत.6 / 8एकवेळेस एसी बंद केल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यासाठी तीन मिनिटे थांबावे लागते. यामुळे सिस्टीमवरील वेग नियंत्रित करण्यास मदत होणार आहे.7 / 8त्वचा आणि डोळे कोरडे पडू शकतात. यामुळे सिक बिल्डिंग सिंड्रोम हा आजार निर्माण होण्याचा धोका असतो. यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, सततचा खोकला, श्वास घेतला तरी घरघर जाणवणे, त्वचेची जळजळ होणे, त्वचेला पुरळ निर्माण होणे, हे प्रकार जाणवतात. दैनंदिन कामकाज करताना वातावरणामध्ये थोडासाही बदल झाला तरी शरीर सहन करीत नाही.8 / 8सततच्या गारव्याने स्वरयंत्रावर अधिक ताण येतो. एसीची थंड हवा त्वचेतील ओलावा काढून टाकू शकते. यामुळे त्वचेला खाज सुटणे आणि जळजळ होणे हे प्रकार घडतात. यातून रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन संसर्गाचा धोका होतो. एसीची थंड हवा स्नायूला लागल्याने स्नायू दुखतात. याशिवाय पेटके येतात. थंड हवेने शरीराचे तापमान कमी होऊन थकवा वाढतो, डोकेदुखी निर्माण होते.