पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून तिथे हिंसाचाराचा घटना सातत्याने समोर येत आहे. हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, ४ मे पासून आतापर्यंत अनेक ठिकाणी निवडणुकीशी संबंधित हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या परिस्थितीनंतर राज्य सरकारने १० सदस्यीय 'फॅक्ट फाइंडिंग कमिटी'ची घोषणा केली आहे.
आसनसोलमधील गोधुली भागात टीएमसीच्या एका कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, तर हावडा येथील दुमुरजाला येथील कार्यालयालाही टार्गेट करण्यात आलं. टॉलीगंज, कसबा, बारुईपूर, कमरहाटी, बारानगर, हावडा आणि बहरामपूर येथील टीएमसी कार्यालयांमध्ये तोडफोड झाल्याची माहिती आहे. बीरभूममध्ये, न्यू टाउनमध्ये आणि इतर दोन ठिकाणी कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी कोलकाता येथील न्यू टाउन परिसरात विजय मिरवणुकीदरम्यान टीएमसी कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत भाजपा कार्यकर्ते मधु मंडल यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे बीरभूमच्या नानूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यकर्ता अबीर शेख यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे.
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राज्यात पहिल्यांदाच भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. ९ मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. भाजपाने प्रचंड बहुमत मिळवत २०७ जागांवर विजय नोंदवला आहे, तर टीएमसी केवळ ८० जागांवर आहे. ममता बॅनर्जी यांना स्वतःची जागाही वाचवता आली नाही. भवानीपूरमध्ये त्यांचा मोठा पराभव झाला असून सुवेंदु अधिकारी यांनी त्यांचा १५,११४ मतांनी पराभव केला आहे.
Web Summary : Post-election violence in West Bengal has resulted in four deaths and the vandalism of over 400 TMC offices. The state government has announced a fact-finding committee to investigate the widespread incidents, including attacks on party workers and offices in multiple districts. BJP claims victory amidst unrest.
Web Summary : पश्चिम बंगाल में चुनाव के बाद हिंसा में चार लोगों की मौत हो गई और 400 से अधिक टीएमसी कार्यालयों में तोड़फोड़ की गई। राज्य सरकार ने जांच के लिए एक समिति गठित की है। कई जिलों में पार्टी कार्यकर्ताओं और कार्यालयों पर हमले हुए हैं। बीजेपी ने अशांति के बीच जीत का दावा किया।