Join us
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर

IPL 2026 Final: गतवर्षीप्रमाणेच  यंदाच्या आयपीएलच्या अंतिम लढतीचा थरारही अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:20 IST

Open in App

गतवर्षीप्रमाणेच  यंदाच्या आयपीएलच्या अंतिम लढतीचा थरारही अहमदाबादमधीलनरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएलमधील नियम आणि  परंपरेप्रमाणे स्पर्धेती अंतिम लढत ही गतविजेत्या  संघाच्या होमग्राऊंडवर खेळली जाते. त्यानुसार  यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या यजमानपदाचा मान हा बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमकडे आहे. मात्र आयपीएलची अंतिम लढत ही नियोजित असलेल्या बंगळुरमधील चिन्नास्वामी स्टेडियम येथून हलवून अहमदाबादमधील नरेंद्र  मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. 

याबाबत मिळालेल्यया अधिक माहितीनुसार IPL 2026 चा अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर येथे  खेळवला जाणार आहे. तर  २६  मे रोजी क्वालिफायर १  लढत धर्मशाला येथे  खेळवला जाणार आहे. त्यानंतर न्यू चंडीगड येथे २७ मे रोजी एलिमिनेटर आणि २९  मे रोजी क्वालिफायर २  लढती  खेळवल्या जातील. शेवटी  ३१  मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना हा   अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर येथे खेळवला जाईल.

आयपीएलच्या नियमानुसार अंतिम लढत ही गतविजेत्यांच्या  होमग्राऊंडवर होते. त्यामुळे अंतिम सामन्याच्या यजमानपदाच्या शर्यतीत बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियम आघाडीवर होतं. मात्र  हल्लीच झालेल्या तिकीट वादामुळे यजमानपदाबाबतचं सगळं गणितच बदलून गेलं आहे. तिकिटांची विक्री आणि  त्याच्याशी संबंधित व्यवस्थापनातील प्रश्नांमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या अंतिम लढतीचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे.   

गतवर्षीही आयपीएलचा अंतिम सामना ऐनवेळी ईडन गार्डनऐवजी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये खेळवण्यात आल्याने मोठा वाद झाला होता.   

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026 Final Moved: Ahmedabad Replaces Bangalore, Schedule Announced

Web Summary : The IPL 2026 final shifts from Bangalore to Ahmedabad's Narendra Modi Stadium. Qualifier 1 is in Dharamshala on May 26th. The final match will be held on May 31st.
टॅग्स :आयपीएल २०२६आयपीएल २०२४नरेंद्र मोदी स्टेडियमअहमदाबादबेंगळूर